Manoj Jarange Protest : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून अंतर वाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. शुक्रवारी जरांगे यांची शिष्टमंडळासोबत चर्चा झाली मात्र या चर्चेत जरांगे यांचं समाधान झालं नाही. त्यामुळे जरांगे आमरण उपोषण करण्यावर ठाम आहेत. दरम्यान उपोषण सुरू केलं तरी राज्य सरकारला चर्चेसाठी दरवाजे खुले असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. .जरांगे यांच्या सोबत राधाकृष्ण विखे आणि प्रसाद लाड यांनी चर्चा केल्यानंतर विखे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांशी चर्चा केली.
मराठा आरक्षणाच्या जीआरच्या यशानंतर मराठवाड्यात मनोज जरांगे पाटलांचा असा भव्य पुतळा उभारला जात असल्याचा व्हिडिओ सोशल माडियावर वेगानं व्हायरल होऊ लागलाय. काही सोशल मिडिया साईट्सवर मनोज जरांगे पाटलांच्या पुतळ्याच्या फोटोंनी तर धुमाकूळ घातलाय.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारने काढलेल्या जीआर फाडत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आंदोलन केलं.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आजच्या पाचव्या दिवशी मोठं यश आलं आहे. सरकारकडून जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी एकीकडे जरांगे जीवाची बाजी लावतायत. मात्र, दुसरीकडे मराठा आंदोलकांनी जरांगेंच्या आवाहनाकडे पाठ फिरवली का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. याचं कारण जरांगे पाटलांनी सांगितलेल्यानंतरही मराठा आंदोलक हे अनेक ठिकाणी हुल्लडबाजी करताना दिसतायत.
आझाद मैदानावर जरांगेंची भेट घेण्यासाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळेंना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्याठिकाणी शरद पवारांविरोधात घोषणाबाजी झाली.
राज्य सरकारनं दिलेल्या वेळेत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी केलेलं हे काही पहिलं उपोषण नाहीये. या मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी पडली ती म्हणजे अंतरवाली सराटीमधून. जरांगेंच्या केलेल्या पहिल्या आंदोलनाला आज दोन वर्षही पूर्ण झाली आहेत.
मुंबईत मराठा समाजाला अवघ्या आठ तासांच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर आझाद मैदानात अन्न शिजवण्यासही परवानगी देण्यात आलेली नाही. असं असतानाही मराठा आंदोलकांचे ट्रक आझाद मैदानात पार्क होऊ लागलेत.
Police Bharti Maratha Candidates: मराठा उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. EWS प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केल्यानं निर्माण झालेला पेच अद्यापही कायम
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचे साथीदार असणाऱ्या अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता आणखी एका सहकाऱ्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम असून आता जरांगेंनी 20 तारखेची मुदत दिली आहे.