'आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय' मनोज जरांगेंचा आरोप... तर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. पण डेडलाईन संपल्यानंतरही काहीही पाऊल न उचलल्याने मराठा समाजा आक्रमक झालाय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंद करण्यात आली आहे.
Oct 25, 2023, 01:06 PM IST'मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच' मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार
Maratha Reservation : दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असं सांगत मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत.
Oct 24, 2023, 09:47 PM IST'डेडलाईन संपायला उरले काही तास, उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं' मनोज जरांगेंचा इशारा
Reservation : धनगरांच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सोडू नका अस आवाहन जरांगे यांनी धनगर समाजाला केलंआहे. तसंच उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.
Oct 24, 2023, 05:00 PM ISTमाढ्यातल्या अजित पवारांच्या सभेत गोंधळ, मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे
मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा देण्यता आला आहे. याचा फटाका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बसला आहे. सोलापूरमधल्या माढ्यात अजित पवार यांच्या सभेत मराटा आंदोलकांनी काळा झेंडे दाखवले
Oct 23, 2023, 01:39 PM ISTमराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, राज्यातल्या साडे सहाशे गावांमध्ये 'नो एन्ट्री'चे बॅनर्स
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावोगावी पुढाऱ्यांनीना गावबंदी करण्यात आलीय.. गावच्या प्रवेशद्वारावरच राजकीय नेत्यांना प्रवेश नाही असे फलक झळकतायत. राज्यातील तब्बल साडेसहाशे गावांमध्ये नो एन्ट्रीचे बॅनर झळकले आहेत.
Oct 21, 2023, 06:25 PM IST'40 दिवस देऊन सरकारचा मान ठेवला, आता 25 ऑक्टोबरपासून...' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Maratha Reservation : 40 दिवस देऊन सरकारचा मान ठेवला आता एक तासही देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अकलूजच्या सभेत राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दिलेल्या डेडलाईनला आता केवळ तीन दिवस उरले आहेत.
Oct 21, 2023, 02:20 PM ISTडेडलाईन हुकणार, आंदोलन पेटणार? 24 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटलांनी सरकारला 24 तारखेपर्यंतची मुदत दिलीय. मात्र जरांगे-पाटलांनी दिलेली मुदत हुकणार असंच चित्र आहे. याला कारण आहे राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने दिलेली वेगळी डेडलाईन
Oct 20, 2023, 09:55 PM IST
मनोज जरांगेंच्या आक्रमक भूमिकेची झळ नेत्यांना, काका-पुतण्यांना प्रवेशबंदी
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंच्या अल्टीमेटमची झळ राजकीय नेत्यांना बसलीय... आक्रमक मराठा समाजानं अनेक गावांमध्ये आमदार, खासदार आणि नेत्यांनाही प्रवेश बंदी केलीय... याचा फटका अगदी पवार काका-पुतण्यांनाही बसणाराय
Oct 19, 2023, 06:45 PM ISTजरांगेंच्या बिनबुडाच्या गोष्टी, त्यांच्या सभेपेक्षा यात्रा मोठ्या; गुणरत्न सदावर्तेंनी केला पलटवार
Maratha Reservation: आज जरांगे बोलले त्या गोष्टीला कुठेही कायदेशीर कनेक्टिव्हीटी नाही. त्यांना फक्त गुन्हे परत घ्यायचे आहेत. त्यांचा आरक्षणाशी संबंध नाही, असे सदावर्ते म्हणाले.
Oct 14, 2023, 01:33 PM ISTमराठा आरक्षणाबाबतची पुनर्विचार याचिका दाखल करुन घेण्यास सुप्रीम कोर्टाचा होकार, पण हे नेमकं काय?
Maratha Reservation: राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील ज्येष्ठ विधिज्ञ मनिंदर सिंह यांनी ही क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेऊन त्यावर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली.
Oct 14, 2023, 10:48 AM IST'मराठ्यांनो, एकजूट दाखवून द्या' मनोज जरांगे-पाटील यांचं आवाहन... जालनात जाहीर सभा
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने 40 दिवसांचा वेळ मागून घेतला होता, यातले 30 दिवस शनिवारी पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची जालनात जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी केली जात आहे.
Oct 13, 2023, 10:06 PM ISTउपोषण मागे घ्यावं, सर्व पक्षीय बैठकीत ठराव... मनोज जरांगे म्हणतात 'दबावाला बळी पडणार नाही'
मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं असा ठराव मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. जस्टिस शिंदेंच्या नेतृत्वात समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच अंतरवाली सराटीत आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या तीन मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
Sep 11, 2023, 11:14 PM ISTआताची मोठी बातमी! कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी होणार आहेत.
Sep 11, 2023, 03:25 PM ISTकुणबी जीआरमधल्या सुधारणेसाठी जरांगेचं शिष्टमंडळ मुंबईत जाणार.. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील सराटी इथं सरु असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. राज्य सरकारने जीआर काढला पण जोपर्तंयत जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे.
Sep 7, 2023, 07:29 PM ISTजीआर काढल्याशिवाय उपोषण मागे नाही, सरकारला आणखी 4 दिवसांची मुदत...दुसरी फेरीही निष्फळ
मराठा आरक्षणाचा वादावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. सरकारने जीआर काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे. त्यामुळे सरकारला आता घाम फुटला आहे.
Sep 5, 2023, 07:13 PM IST