marathi movie

'द केरळ स्टोरी' फुकट दाखवणाऱ्यांवर भडकले केदार शिंदे, म्हणाले महाराष्ट्रातले नेते...

Kedar Shinde on The Kerala Story: 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची तूफान पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या यशावरुन दिग्दर्शक केदार शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र मराठी सोडून हिंदी चित्रपट मोफत दाखवणाऱ्यांवर केदार शिंदे चांगलेच भडकले आहेत.

May 8, 2023, 09:23 AM IST

'डांबुन ठेवलं, जेवणही दिलं नाही...', पाकिस्तान बॉर्डरजवळ मराठी कलाकारांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Baloch Team Horrifying Experience : 'बलोच' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संपूर्ण टीमला खूप मोठा आणि अनपेक्षित गोष्टीला तोंड द्यावे लागले. या चित्रपटाचा सहनिर्माता आणि अभिनेता अमोल कांगणेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 

May 5, 2023, 04:47 PM IST

PS 2 विसरा, 'महाराष्ट्र शाहीर'च्या कमाईचा आकडा गाजतोय पाहिलं का?

Maharashtra Shahir Box Office Collection : 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासून चांगली कमाई केली आहे. चित्रपटानं सगळ्यात जास्त कमाई ही 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त झाली. तर अंकुश पहिल्यांदा कोणत्या बायोपिकमध्ये दिसला आहे.  

May 4, 2023, 12:03 PM IST

'या' चित्रपटाला मिळेना थिएटर; दिग्दर्शकाला अश्रू अनावर; पाहा VIDEO

TDM Movie Not Getting Theatre: 'टीडीएम' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे परंतु या चित्रपटांना प्राईम टाईम (TDM Tralier) मिळत नसल्याचे या कलाकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या हा वाद सोशल मीडियावर गाजतो आहे. अनेक सोशल मीडिया यूझर्सही याबद्दल पोस्ट (TDM Viral Post) करताना दिसत आहेत. 

May 2, 2023, 03:51 PM IST

Prajakta Mali ची 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटासाठी खास पोस्ट म्हणाली...

केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या चित्रपटात आपल्याला शाहीर साबळे यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट त्यांचा नातू केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन 3 दिवस झाले असले तरी त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक लोक हे हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. तर त्याच निमित्तानं मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं एक पोस्ट शेअर केली आहे. 

May 1, 2023, 05:58 PM IST

'श्वास'मधील बालकलाकार 'परशुराम' आठवतोय? 19 वर्षानंतर इतका वेगळा दिसतोय की ओळखताच येईना

Shwaas Marathi Movie Child Artist: 'श्वास' हा चित्रपट प्रदर्शित गाजला होता. या चित्रपटातील बालकलाकार (Ashwin Chitale) परश्या आता मोठा झाला असून तो आपल्या करिअरच्या वेगळ्या वाटा धुंडाळतो आहे. तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Apr 25, 2023, 10:21 AM IST

Viral Video : 'नटरंग'वर गुरु -शिष्याची अनोखी जुगलबंदी, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

Little Boy Viral Video : वर्गात सरांनी हार्मोनियम वाजवायला घेतली, संगीताचे सूर त्याचा कानावर पडताच त्या विद्यार्थ्याला हारवलं नाही मग त्याने...सोशल मीडियावर गुरु शिष्याची ही जुगलबंदी यूजर्सचं मनं जिंकत आहे. 

Apr 20, 2023, 11:27 AM IST

Zapatlela: तात्या विंचू झाला 30 वर्षांचा! सत्यजित पाध्येंनी शेअर केल्या जुन्या आठवणी

Zapatlela Completes 30 Years Today: झपाटलेला हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला आहे. आज या चित्रपटाला चक्क (Zapatlela Marathi Movie) 30 वर्षे पुर्ण होत आहेत. 1993 साली हा चित्रपट आजच्या दिवशी प्रदर्शित झाला होता. त्याच्या आठवणी सत्यजित पाध्ये (Satyajit Padhye) यांनी सोशल मीडियावरून शेअर केल्या आहेत. 

Apr 16, 2023, 03:32 PM IST

'मराठी पाऊल पडते पुढे'  सिनेमा ५ मे रोजी प्रदर्शित होणार

मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईतील दादर क्लब येथे गुरूवारी 13 एप्रिल रोजी आयोजित करण्याता आला होता. जेष्ठ विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते संगीत प्रकाशित करण्यात आले.

Apr 15, 2023, 06:59 PM IST

Ved on OTT: प्रतिक्षा संपली! 'वेड' चित्रपट आता पाहता येणार घरबसल्या, 'या' OTT वर होणार प्रदर्शित

Ved on OTT: सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाची बहार आता तुम्हाला लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरून (Ved on OTT Platform) पाहायला मिळणार आहे. तुम्हीही 'वेड' या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत असाल तर आता तुमची वाट संपली आहे. तेव्हा जाणून घ्या ओटीटीवर 'वेड' (Ved on OTT Date) हा चित्रपट कधी, कुठे आणि केव्हा प्रदर्शित होता आहे.

Apr 14, 2023, 12:17 PM IST

Video : सबसे कातील गौतम पाटीलच्या पहिल्या वहिल्या 'घुंगरू'चा टीझर पाहिला का?

Gautami Patil Video : 'सबसे कातील, गौतमी पाटील' हिचा पहिल्या वहिल्या मराठी चित्रपट 'घुंगरू'चा (Ghungroo) टीझर आऊट झाला आहे. तुम्ही पाहिला का हा टीझर?

Apr 10, 2023, 01:39 PM IST

नातेवाईक हा वैताग आणणारा प्रकार, माझ्या बायकोने.... प्रसाद ओक असं का म्हणाला?

Prasad Oak : धर्मवीर चित्रपटानंतर प्रसाद ओकला प्रेक्षकांनी चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या प्रसाद ओकने त्याच्या नातेवाईकांबाबत परखड भाष्य केले आहे. 

 

Mar 19, 2023, 03:12 PM IST

Raavrambha : ओम आणि मोनालिसा उलगडणार 'रावरंभा'ची प्रेमकहाणी

इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अशीच एक अनोखी प्रेमकथा मराठी रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या १२ मेला मोनालिसा बागल आणि ओम भूतकरचा 'रावरंभा' हा सिनेमा  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mar 15, 2023, 08:18 PM IST

Girija Oak Kissing Scene : गिरिजाच्या पहिल्या Kiss चा किस्सा...

गिरीजा ओक (girija oak kissing scene) ही मराठी सिनेमातील अत्यंत देखणी आणि गुणी अभिनेत्री. अनेक दर्जेदार सिनेमे आणि मालिकांमध्ये गिरिजाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे . दरम्यान गिरिजाने ((girija oak kissing scene)) तिच्या पहिल्या किसाचा अनुभव शेअर केला आहे.

Feb 9, 2023, 11:24 AM IST