marathi news

एसटी बँकेत सदावर्तेंची सत्ता जाणार? गंभीर आरोप करत 14 संचालकालांनी सोडली साथ

Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी बँकेच्या निवडणुकीत मोठं यश मिळवलं होतं. पण आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी निवडून आणलेल्या 19 पैकी 14 संचालकांनी त्यांची साथ सोडली आहे.

Nov 24, 2023, 05:50 PM IST

समुद्रातलं सोनं! गुजरातने राज्य माशाचा दर्जा दिलेल्या माशाच्या किमतीत तुमची युरोप टूर होईल

Ghol Fish Gujarat State : महागड्या आणि दुर्मिळ घोळ माशाला नुकतेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचा राज्य मासा घोषित केले आहे. अहमदाबाद येथे आयोजित ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023 मध्ये भूपेंद्र पटेल यांनी ही घोषणा केली.

Nov 24, 2023, 05:07 PM IST

चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या आजारामुळे रुग्णालयाच्या बाहेर रांगा; भारतात अलर्ट

Mysterious Virus Infection in China : सध्या चीनला एका रहस्यमयी श्वसनाच्या आजाराने ग्रासलं आहे. चीनमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात न्यूमोनियाचा त्रास दिसून येत आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Nov 24, 2023, 04:23 PM IST

कागदपत्रांवर सही केली नाही म्हणून RTO कार्यालयात घुसून एजंटंचा कर्मचाऱ्यावर चॉपरने हल्ला

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये एका परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यावर एजंटंने थेट चॉपरने हल्ला केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे.

Nov 24, 2023, 01:22 PM IST

सूर्यकुमार यादव T20 मध्ये हिट आणि ODI मध्ये फ्लॉप का ठरतो?

भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटर सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्यावर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 24, 2023, 12:45 PM IST

IDBI बँकेत बंपर भरती, चांगल्या पगारासाठी पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

IDBI Recruitment 2023: आयडीबीआय बॅंकेत तब्बल 2100 रिक्त पदे भरली जाणार आहेत.  याअंतर्गत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह- सेल्स & ऑपरेशन्सची पदे भरली जाणार आहेत. 

Nov 24, 2023, 12:27 PM IST

'पंकजा मुंडे शिंकल्या तरी...'; 'त्या' व्हायरल व्हिडीओवर चंद्रकांत पाटलांचा खोचक कटाक्ष

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डोळ्यांचा चष्मा लागला आहे. त्यांनी स्वतःच एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. मात्र या व्हिडीओवरुन अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

Nov 24, 2023, 11:46 AM IST

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी AI 'असे' करणार काम, जाणून घ्या

Intelligent Transportation System: समृद्धी महामार्गावर ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे टाकण्यात येत असून ठराविक अंतरावर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. नियंत्रण कक्षाकडून कॅमेऱ्यांकडून मिळालेले फुटेज तपासण्यात येणार आहे.

Nov 24, 2023, 11:39 AM IST

नोटांचा डोंगर... कारमध्ये सापडलेले पैसे पाहून पोलिसांनाही बसला धक्का

Telangana Assembly Elections 2023 : तेलंगणात विधानसभा निवडणुकीच्या आठवड्याभरापूर्वीच मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली आहे. हैदराबाद पोलिसांनी एका वाहनातून ही रक्कम जप्त केली आहे.

Nov 24, 2023, 10:41 AM IST

'यामध्ये राजकीय अजेंडा..'; मोदींवर राहुल गांधींनी केलेल्या 'पनौती' टीकेबद्दल मोहम्मद शमीनं माडलं परखड मत

Rahul Gandhi Panauti comment : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवरुन सध्या राजकारण तापलं आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पनवती म्हटल्यावर मोहम्मद शमीने याबाबत भाष्य केलं आहे.

Nov 24, 2023, 09:21 AM IST

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षेचा पॅटर्नच बदलला

Board Exam : दहावी, बारावीच्या परीक्षाही आता सहामायी आणि वार्षिक पद्धतीने घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

Nov 24, 2023, 08:34 AM IST

आईसोबत घरी जात असताना शाळकरी मुलावर कोसळली सळई; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Accident : पुण्यात एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. डोक्यात लोखंडी सळई कोसळल्याने नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Nov 23, 2023, 04:31 PM IST

धाराशिव जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना, 24 बोटांचे बाळ आले जन्माला

Medical Miracle : धाराशिव जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना समोर आली आहे. चक्क 24 बोटांचे बाळ जन्माला आलंय. महत्त्वाची बाब म्हणजे हात व पायाच्या बोटाला प्रत्येकी ६ बोटे आहेत. 

Nov 23, 2023, 04:05 PM IST

28 वर्षांनंतरही वाचून पूर्ण होत नाहीये 'हे' पुस्तक; नक्की काय आहे त्यात?

28 वर्षांनंतर, कॅलिफोर्नियामधील एका बुक क्लबने जेम्स जॉयस यांचे फिनेगन्स वेक हे पुस्तक वाचून संपवलं आहे. पण या पुस्तकात असे काय आहे? जे 28 वर्षांपासून वाचून अजूनही पूर्ण झाले नाही.

Nov 23, 2023, 03:45 PM IST