marathi news

ऐतिहासिक मंदिरे पाडणाऱ्या पाकिस्तानाने युनेस्कोमध्ये भारताला हरवलं; निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

Pakistan Defeated India : युनेस्कोच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. पाकिस्तानला 38 मते मिळाली, तर भारताला केवळ 18 मते मिळाली.

Nov 26, 2023, 12:52 PM IST

नवऱ्याला झोपेची गोळी देऊन रात्री सासऱ्यांच्या रुममध्ये जायची, सासूने त्यांना त्या अवस्थेत पाहिलं अन् मग...

नात्यांना लाजवेल असं एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. पती पत्नीच्या नात्याला तडा देत ती रोज रात्री पत्नी सासऱ्यांच्या रुममध्ये जायची...

Nov 26, 2023, 12:11 PM IST

शाहिद-सैफ नाहीत करीनाचं पहिलं प्रेम, 13 वर्षाची असतानाच गुंतला होता जीव

Kareena Kapoor 1st Love:अभिनेते विक्की निहलानी हे करीनाचे पहिले प्रेम होते. विक्की आणि मी सोलमेट आहोत. ते नेहमी माझ्यासोबत राहिले. ते माझं पहिलं प्रेम होते. 13 वर्षाची असताना मला त्यांच्यावर प्रेम झाले होते, असे करिनाने सांगितले. विक्की दिग्गज निर्माता पहलाज निहलानीचा मुलगा आहे. ब्रेकअपनंतर विक्की निहलानीने इटालियन महिला जस्टिन रुमेऊसोबत संसार थाटला. 43 वर्षी आजाराने विक्कीच्या पत्नीचे निधन झाले.

Nov 26, 2023, 12:05 PM IST

समोरुन एक्स्प्रेस येत असतानाच ड्रायव्हरने रेल्वे ट्रॅकवर पळवला ट्रक; ब्रेक दाबला तरी...

Golden Temple Express : पंजामध्ये गोल्डन टेंपल एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला आहे. रेल्वे ट्रॅकवर एका मद्यधुंद ट्रक ड्रायव्हरने एक किमीपर्यंत ट्रक पळवण्याने मोठा अपघात होणार होता. मात्र ट्रक रेल्वे ट्रॅकमध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

Nov 26, 2023, 11:28 AM IST

मुंबईकरांची सकाळ वादळी पावसाने; घरांचे पत्रेही उडाले

मुंबई आणि राज्यात आज पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे मुंबईतील प्रदूषणाची पातळी देखील कमी झाली आहे.

Nov 26, 2023, 10:08 AM IST

Asia Cup 2023 साठी भारतीय संघात बीडच्या मुलाची निवड; धनंजय मुंडेंने केले अभिनंदन

दुबईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या अंडर-19 आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 25 नोव्हेंबर (शनिवार) रोजी बीसीसीआयच्या कनिष्ठ क्रिकेट निवड समितीने 15 सदस्यांची घोषणा केली.

Nov 26, 2023, 09:32 AM IST

VIDEO: अपघातात जखमी झालेल्या तरुणासाठी मोहम्मद शमी ठरला देवदूत; खड्ड्यात उतरुन वाचवला जीव

Mohammed Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने नैनिताल येथे रस्ता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. शमीने या अपघाताचा व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

Nov 26, 2023, 08:37 AM IST

ट्रेनमधून प्रवास करताय? प्रवाशांना रेल्वे तिकिटासह मिळतात 'या' सुविधा

भारतीय रेल्वे ही देशाची  लाईफलाईन मानली जाते. तुम्हाला देशात कुठेही जायचे आहे, फक्त रेल्वेचे तिकीट खरेदी करा आणि आरामात बसून किंवा झोपून तुम्हाला हव्या त्या ठिकाणी पोहोचता. पण तुम्ही वारंवार ट्रेनने प्रवास करत असल्यास, तुम्हाला तिकीटासोबत उपलब्ध असलेल्या इतर सुविधांबद्दल पूर्ण माहिती आहे का? 

Nov 25, 2023, 05:38 PM IST

दादासमोर नाक उचलून...अपात्रता प्रकरणावरुन चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा, म्हणाल्या, 'ज्यांच्या जिवावर...'

Rupali Chakankar criticizes Supriya Sule : अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी टीका केली होती. त्यावर आता अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Nov 25, 2023, 12:43 PM IST

दुकानांवर मराठी देवनागरीत फलक बंधनकारक, नसेल तर काय कारवाई? जाणून घ्या

Marathi NamePlate:  मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर दिनांक 28 नोव्‍हेंबर 2023 पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.

Nov 25, 2023, 12:20 PM IST

लपाछपी खेळताना अशा जागी लपल्या की परतल्याच नाही; दोन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

Shocking News : राजस्थानात लपाछुपी खेळताना दोन बहिणींचा जीव गेला आहे. लपाछुपी खेळताना दोघी अशा जागी लपल्या की त्या तिथून पुन्हा बाहेरच येऊ शकल्या नाहीत.पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांकडे सुपूर्द केले आहेत.

Nov 25, 2023, 11:53 AM IST

'माझा मृत्यू होईल तेव्हा...'; मुलीला 50 कोटींचा बंगला दिल्यानंतर अमिताभ यांचे जुने ट्वीट व्हायरल

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चन हिला त्यांचा कोट्यावधींचा बंगला भेट दिला आहे. अमिताभ त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात याच बंगल्यात राहत होते. 

Nov 25, 2023, 10:50 AM IST

40 मिनिटांचा प्रवास फक्त 4 मिनिटात! विठ्ठलवाडीतून कल्याण नगर महामार्गावर जाण्यासाठी नवा मार्ग

Kalyan Nagar Highway : विठ्ठलवाडीतून आता कल्याण अहमदनगर राष्टीय महामार्गावर जाण्यासाठी नव्या उन्नत मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षात हा रस्ता प्रवाशांच्या सेवेत असणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

Nov 25, 2023, 09:18 AM IST

Marathwada Water Issue : मराठवाड्याचं पाणी आरक्षणानं रोखलं, मराठा आंदोलकांच्या बदनामीचा डाव?

Marathwada vs North Maharashtra: मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून आधीच वाद पेटलेला (Marathwada Water Dispute) असताना आता या वादाला आरक्षणाचं ग्रहण लागलंय. जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी लिहिलेल्या पत्रानं खळबळ उडालं. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही यांनी यानिमित्तानं सरकारवर निशाणा साधलाय. 

Nov 24, 2023, 08:55 PM IST