marathi news

उसने पैसे परत करायला गेलेल्या महिलेसोबत सामुहिक बलात्कार; मैत्रिणीनेच केले घृणास्पद कृत्य

UP Crime : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका महिलेवर दोन तरुणींनी सामुहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्यामध्ये तिच्या मैत्रिणीने देखील आरोपींना साथ दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक केली आहे.

Sep 9, 2023, 11:22 AM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला विशेष योग! 3 राशींच्या मंडळींवर बसरणार बाप्पांची कृपा

Ganesh Chaturthi 2023 : लवकरच मोठ्या मंडळापासून घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. यंदा 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीला विशेष योग जुळून आला आहे. त्यामुळे तीन राशींच्या लोकांना वरदान ठरणार आहे. 

Sep 9, 2023, 11:12 AM IST

कोकण रेल्‍वे गेटमन हत्या प्रकरणात मोठा खुलासा; मेहुण्यानेच झाडल्या गोळ्या

Raigad Crime : गेल्या महिन्यात कोकण रेल्वेत गेटमन असलेल्या चंद्रकांत कांबळे यांची भरदिवसा हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर आरोपीने तिथून पळ काढला होता. आता या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाचा खुलासा केला.

Sep 9, 2023, 09:48 AM IST

राज्याच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट! शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच सुनावणी

Mla Disqualification Case : गेल्या वर्षभरापासून राज्याचे लक्ष्य लागलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावर आता लवकरच सुनावणी होणार आहे. यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या विधिमंडळाने नोटीस पाठवली आहे.

Sep 9, 2023, 08:47 AM IST

US चे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी विमानतळावर बोलणारी ती चिमुकली कोण?

G20 Summit 2023 : दिल्ली आजपासून G 20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन भारतात आले आहे. यावेळी विमानतळा एक चिमुकली त्यांच्या स्वागतासाठी हजेर होती. बिडेनसोबत बोलणारी ही चिमुकली नेमकी आहे तरी कोण? 

Sep 9, 2023, 08:02 AM IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे. अशातच राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Sep 9, 2023, 07:48 AM IST

Video : प्लॅटफॉर्म येण्याआधीच तरुणाने लोकल ट्रेनमधून मारली उडी; कुर्ला-मानखुर्द दरम्यान प्रकार

Mumbai Local : मुंबई लोकलमधील स्टंटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वेने प्रवास केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिलं आहे.

Sep 9, 2023, 07:11 AM IST

ऐश्वर्या रायसारखी दिसणारी सलमानची हिरोईन 18 वर्षांनी कशी दिसतेय

Sneha Ullal: Sneha Ullal: स्नेहाने लकी सिनेमातू डेब्यू केला आणि सलमान खानसोबत काम केले. स्नेहा उल्लाह ऐश्वर्या रायसारखी दिसते, अशा चर्चा सुरु झाल्या. स्नेहाच्या या सिनेमाला 18 वर्षे पूर्ण झाली. आता तर ती आणखीच सुंदर दिसते. सोशल मीडियात ती फोटो शेअर करत असते. आता स्नेहा खूपच ग्लॅमरस झाली आहे. तिचे फोटो पाहून चाहते कौतुक करत असतात. 

Sep 8, 2023, 06:31 PM IST

रात्रीची शिळी चपाती खाण्याचे 'हे' फायदे

Eating Stale Chapatis Benefits:सकाळी दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्यास अॅसिडीटी दूर होईल. पचनक्रिया सुधारण्यासाठी शिळी चपाती खातात. यामध्ये फायबर असतात. शिळी चपाती खाल्ल्याने साखर आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. दूधासोबत खाणे फायदेशीर असते. शिळी चपाती खाल्ल्याने शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते. 

Sep 8, 2023, 05:59 PM IST

रात्री उशीरा जेवण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा; कारण...

आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी दिनचर्याने करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. संतुलित सकाळच्या विधीसाठी जागे होणे तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत करते. पण तुमचा दिवस योग्य प्रकारे संपवण्याचे महत्त्व तुम्ही कधी विचारात घेतले आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस कसा घालवता यावरून तुमची एकूण जीवनशैली परिभाषित होते, रात्रीचे जेवण आणि रात्रीचे विधी या प्रक्रियेचे अंगभूत भाग बनवतात. म्हणूनच, आज आम्ही योग्य वेळी रात्रीचे जेवण घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे ध्येय ठेवले आहे. "तुमचे रात्रीचे जेवण लवकर करा" - ही अशी गोष्ट आहे जी ऐकून आपण सर्वजण मोठे झालो आहोत.

Sep 8, 2023, 05:29 PM IST

10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते. 

Sep 8, 2023, 05:16 PM IST

बादशाहला खूश ठेवणाऱ्या दासींना मिळायची 'अशी' वागणूक

Mughal Harem Emperors: मुघल हरममध्ये एकदा प्रवेश केला की दासीला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. हरममध्ये असलेल्या दासीला सर्व सुख सुविधा पुरवल्या जायच्या. दासींना शाही पंच पकवान्न पुरवली जायची. दासींना चिकन पुलाव, मांस पुरवले जायचे.

Sep 8, 2023, 04:24 PM IST

'द बीस्ट' : 9000 किलो वजन, अ‍ॅक्शन शॉटगन अन्.. अशी आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची कार

जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बयाडेन भारतात येत आहेत. 8 सप्टेंबरला ते दिल्लीला पोहोचतील. बायडेन येथे 'द बीस्ट' या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कॅडिलॅक कारमधून प्रवास करणार आहेत. बोइंग सी-17 ग्लोबमास्टर-3 विमानाने या गाड्या भारतात आणल्या जाणार आहेत.

Sep 8, 2023, 04:15 PM IST

Video: महिलेने काम मागितल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, 'तुला चांद्रयान-4 मध्ये बसवून चंद्रावर पाठवू'

CM Manohar Lal Khattar : हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. एका कार्यक्रमात महिलांना रोजगारासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी अजब उत्तर दिलं आहे.

Sep 8, 2023, 03:49 PM IST

बेडवरुन खाली पडलेल्या महिलेल्या उचलण्यासाठी बोलवावं लागलं अग्निशमन दल; ठाण्यातील विचित्र घटना

Thane News : ठाण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. बेडवरुन खाली पडलेल्या महिलेला उचलण्यासाठी चक्क ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महिलेच्या घरी पोहोचून तिला सुखरुप बेडवर ठेवलं आहे

Sep 8, 2023, 02:36 PM IST