जरांगेंकडून आज वात, 30 ऑक्टोबरला धमाका; मराठा उमेदवारीकडं राज्याचं लक्ष

Manoj Jarange on Vidhansabha:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.. 

Updated: Oct 24, 2024, 09:16 PM IST
जरांगेंकडून आज वात, 30 ऑक्टोबरला धमाका; मराठा उमेदवारीकडं राज्याचं लक्ष title=
मनोज जरांगे

Manoj Jarange on Vidhansabha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.. आज मुलाखती झाल्यानंतर जरांगे पाटील हे 30 तारखेला उमेदवार घोषीत करणार आहेत.. त्यामुळे जरांगे पाटील कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार आणि कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे.विधानसभा निवडणुकीत लढणार की पाडणार यावरून निर्णय पक्का करत जरांगे पाटील यांनी लढण्याचा निर्धार केलाय.. विधानसभेला उमेदवार देणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केलीय. तर 24 तारखेला राज्यभरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीची जरांगे पाटील यांनी घेतलेत.. मात्र खरा धमाका होणार आहे तो 30 तारखेला कारण 30 तारखेला जरांगे पाटील हे उमेदवारांची घोषणा करणार आहे.. त्यामुळे जरांगे पाटलांचे उमेदवार कोण असणार आणि राज्यभरातील एकूण किती मतदारसंघात जरांगे पाटील उमेदवार देणार याची उत्सुकता ताणली गेलीय.

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा गेमचेंजर ठरल्याचं पाहायला मिळालं.. आता विधानसभेला जरांगे पाटील उमेदवार देणार असल्याने महायुती आणि मविआचं टेन्शन नक्कीच वाढलं असणार.. त्यामुळे आता 30 ऑक्टोबरला जाहिर होणाऱ्या जरांगे पाटलांच्या उमेदवार यादीची प्रतीक्षा आहे 

कुठल्या जागा लढणार आणि कुठल्या जागा पाडणार?

येत्या दोन दिवसात कुठल्या जागा लढणार आणि कुठल्या जागा पाडणार याबाबत निर्णय घेऊ आणि जाहीर करू अशी घोषणा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केली आहे. राज्य सरकारला संधी दिली होती, मात्र त्यांनी संधीचा सोनं केलं नाही आता युद्ध अटळ असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. माझी निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती मात्र समाजाची इच्छा होती त्यामुळे त्यांचं मला ऐकावं लागतं. आता, लढणार , पाडणार , जिरवणार अशी घोषणाच जरांगे पाटील यांनी दिली आहे. 

राज्यात कुठल्या जागा लढणार आणि कुठल्या जागा पाडणार याबाबत 2 दिवसात निर्णय घेणार असल्याचं सांगत जरांगे पाटील यांनी  मोजक्या लोकांनी अर्ज भरावे जास्त लोकांनी अर्ज भरू नये अन्यथा परत घेताना गोंधळ होईल असं आवाहन केलं आहे.  आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण (Maharatha Reservation) जाहीर करण्याची संधी दिली होती मात्र त्यांनी संधीचं सोनं केलं नाही आता युद्ध अटळ आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आमचा कुठलाही पक्ष टार्गेट नाही मात्र देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला आरक्षण देऊ दिले नाही हे खरं आहे. एकनाथ शिंदे यांना याचं नुकसान होईल की नाही याबाबत दोन दिवसानंतर विचार करू असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं.मी मुस्लिम धर्मगुरूला भेटलो तर यांच्या पोटात का दुखलं, दलित मुस्लिम मराठ्यांना एकत्र येऊ न देणे हा यांचा डाव आहे यांनी मला पर्याय ठेवला नाही म्हणून आम्ही एकत्र आलो असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

मराठा बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय

अंतरवाली सराटी इथं झालेल्या मनोज जरंगे पाटील यांच्या सकल मराठा समाज बैठकीतील तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार 

1. जी जागा जिंकून येऊ शकते अशा ठिकाणी  उमेदवार उभे करणार.

2. SC आणि  ST ठिकाणी जो आपल्याशी बांधील असेल त्यांना आपण लाखभर मतं /पाठिंबा द्यायचा.

3. जिथे आपण उमेदवार देणार नाहीत,तिथे जो बॉण्डवर लिहून देईल की आपल्याला आरक्षण देणार त्याला आपण साथ देऊ.