राणेंचा प्रचार नाही, दीपक केसरकर आक्रमक
कोकणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू आहे. काँग्रेसनेते नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी मदत न करण्याचा निर्णय सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगूनही दीपक केसरकर आक्रमक दिसत आहे. ते आपल्या निर्णयावर ठाम असून नीलेश राणेंचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केलेय. दरम्यान, आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार, अशी माहिती केसरकर यांनी दिलेय.
Apr 3, 2014, 11:27 AM ISTराऊत, राणे आज भरणार अर्ज, राणेंचा राष्ट्रवादीला इशारा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं दोन्ही उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे विनायक राऊत दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल करणार असून यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपचे विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.
Mar 25, 2014, 09:25 AM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणेंविरोधात राष्ट्रवादीचे बंड
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सिंधुदुर्गातला संघर्ष वाढला आहे. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र खासदार नीलेश राणे यांनी गेली साडे चार वर्षे राष्ट्रवादीला त्रास देण्याचे काम केले आहे. त्यामुळे राज्यात या दोन पक्षाची आघाडी झाली असली तरी आम्ही सिंधुदुर्गात काँग्रेसला मदत करणार नाहीत, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीने घेतली आहे.
Mar 7, 2014, 09:00 AM ISTखा. नीलेश राणेंचं महिला वॉर्डनशी असभ्य वर्तन
एकीकडे महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं उघडकीस येत असतानाच आता खासदारही महिलांना धमकवण्यात मागे नसल्याचं दिसून येत आहे. नारायण राणे यांचा मुलगा आणि खासदार निलेश राणे याने एका महिला वॉर्डनला धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.
Jan 28, 2013, 04:08 PM ISTभास्कर जाधव यांचा निर्लज्जपणा - नीलेश राणे
नगरपालिका आणि त्यानंतर झेडपी निवडणुकीत राणे-जाधव वस्त्रहरण नाट्याचा आता निवडणूक निकालानंतरचा प्रयोग सुरू झाला आहे. सिंधुदुर्गच्या जनतेनं राष्ट्रवादीला स्वीकारलं मात्र रत्नागिरीतल्या जनतेनं बाहेरच्या लोकांना स्वीकारलं नाही असा टोला रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना लगावला आहे.
Feb 23, 2012, 10:25 AM ISTराणे-जाधव वादाचं लोण मलवणमध्येही !
मालवणमध्ये राणे पिता-पुत्रांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं, तर, आता खवळलेले काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मालवणमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मांजरेकर यांच्या घरावर राणे समर्थकांनी दगडफेक केली.
Nov 8, 2011, 12:55 PM IST