opposition

'काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही'

काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही, असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना मंगळवारी औपचारिकरित्या कळवलंय. अपुरे संख्याबळ आणि पदाबाबतची आजवरची प्रथा याचा विचार करुन काँग्रेसला विरोधीपक्षनेतेपद नाकरण्यात आलंय. 

Aug 20, 2014, 09:43 AM IST

कौरव-पांडव कोण हे जनताच ठरवेल - अजित पवार

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप जोरदार होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. पाच जण एकत्र आले म्हणून पांडव बनत नाहीत, असा टोला अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावलाय. सत्तेपासून बाहेर गेल्यानं विरोधकांची बडबड सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

Mar 6, 2014, 03:36 PM IST

आदर्श अहवाल लटकला, विरोधक संतप्त

आदर्श चौकशी आयोगाचा अहवालावरून आता राजकारण तापलं आहे. हा अहवाल पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल अशी शक्यता होती.

Aug 2, 2013, 07:52 PM IST

सिंचन मुद्यावरून विरोधकांचा ठिय्या, कामकाज तहकूब

सिंचनाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे अखेर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. मात्र विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभेतच ठिय्या मांडला.

Jul 29, 2013, 04:31 PM IST

नेमेची येतं `पावसाळी अधिवेशन`!

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. `नेमेची येतो मग पावसाळा` या उक्तीप्रमाणे विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर यावेळीही बहिष्कार टाकला.

Jul 15, 2013, 09:27 AM IST

कर्नाटक भाजपचा पराभव, शिवसेनेला आनंद

सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय करणारी सत्ता गेली, याचा शिवसेनेला आनंद असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

May 8, 2013, 06:24 PM IST

भाजपला विरोधी पक्षनेतेपदही नाहीच....

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार. काँग्रेसने भाजपचा अक्षरश: दारूण पराभव केला आहे.

May 8, 2013, 12:12 PM IST

जनता दल कर्नाटकात विरोधी पक्ष

कर्नाटकात दुसऱ्या स्थानावर जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाने मुसंडी मारत भाजपलाही मागे टाकले आहे. भाजपला जनतेने सत्तेतून खाली खेचताना त्यांना विरोधी पक्षाचाही दर्जा दिलेला नाही. मात्र, जनता दलाने जोरदार मुसंडी मारत विरोधी पक्षपद पटकावलेय.

May 8, 2013, 12:10 PM IST

एकतर्फी राजीनामा नाही; अजित पवारांना उपरती

‘आता पुन्हा एकदा एकतर्फी राजीनामा देणार नाही’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.

Apr 11, 2013, 01:09 PM IST

‘पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत मतभेद नाहीत’

कोळसा खाण घोटाळ्यावरून पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांनी गदारोळ कायम ठेवला. त्यामुळं सुरूवातीलाच दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

Aug 23, 2012, 12:20 PM IST

अधिवेशनातून काही निष्पन्न होईल?

मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर सरकारचा कारभार रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असताना आता सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात आदर्श घोटाळा, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि राज्यातील भूखंड घोटाळ्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हं आहेत.

Jul 7, 2012, 10:44 PM IST

मनसेनेनं सत्तेसाठी करून दाखवलं

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मनसे किंग नसली तरी किंगमेकरच्या भूमिकेत दिसली. काल झालेल्या निवडणुकीत मनसेने पाठिंबा दिल्याने तसेच सत्तेत सहभागी होत आपणच सत्तेचं गणित बांधू शकतो हेच दाखवून दिले आहे.

Mar 22, 2012, 03:39 PM IST

हिवाळी अधिवेशन होणार चांगलेच गरम....

विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमांवर सत्ताधाऱ्यांनी बहिष्कार घालून संघर्षाचे संकेत दिले आहेत.

Dec 12, 2011, 05:16 AM IST