prithviraj chavan

सेझवरून मोदींनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

सेझच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात जुगलबंदी रंगली. पंतप्रधानांनी पृथ्वीराज चव्हाणांना चिमटा काढला.. मुख्यमंत्री आधीच्या सरकारला हे असं काही सांगतं नव्हते असं पंतप्रधानांनी सुनावलं..

Aug 16, 2014, 08:31 PM IST

मवाळ झालेल्या राणेंना मुख्यमंत्र्यांचा टोमणा

मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफ डागणारे आणि नंतर सपशेल माघार घेणारे नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकाद डिवचलंय. विधानसभा निवडणूकीत काँग्रेची उमेदवारी नाती-गोती पाहून नव्हे तर निवडून येण्याच्या क्षमतेवरच दिली जाईल असं चव्हाणांनी स्पष्ट केलंय. 

Aug 9, 2014, 02:38 PM IST

10 वर्ष राष्ट्रवादीनं सत्ता भोगली तेव्हा दोष सापडले नाहीत- मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत इतकी वर्षे सत्ता भोगली तेव्हा त्यांना दोष सापडले नाहीत. मात्र, लोकसभेचे निकाल धक्कादायक लागताच आता प्रत्येकाला शहाणपण सुचू लागलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी. पी. त्रिपाठी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

Aug 3, 2014, 04:13 PM IST

राणेंचं मन वळविण्याची 10 जनपथवरही चर्चा

 उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नाराजीमुळं राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरुन दिल्लीत खलबतं सुरु आहेत. याच संदर्भात दिल्लीत दहा जनपथवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधीची भेट घेतली.

Jul 20, 2014, 08:17 PM IST

गोहत्या बंदीसाठी वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले

गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी वारकरी जनआंदोलन समितीनं आंदोलन केलं. वारक-यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या महापुजेपासून रोखण्याचा प्रयत्न केला.

Jul 9, 2014, 09:13 AM IST

उद्धव ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा समाचार

 

पुणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लवासाचं समर्थन करणारे NCP अध्यक्ष शरद पवार यांचा खरपूस समाचार घेतला. शरद पवारांना जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, दुष्काळ दिसत नाही. त्यांना फक्त लवासासारखी आणखी शहरं हवीत, असा हल्ला ठाकरेंनी चढवला. 

Jun 25, 2014, 03:30 PM IST