अजित दादा बिनखात्याचे मंत्री!
कोणत्याही मुद्द्यावर विधीमंडळात चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली, तरी त्यांच्याकडे अद्याप कोणती खाती देण्यात आलेली नाहीत.
Dec 9, 2012, 08:56 PM IST`पुळचट मुख्यमंत्री, अजितदादा मुख्यमंत्री होणारच`
`असले पुळचट मुख्यमंत्री काय कामाचे, त्यापेक्षा आमच्या अजितदादांकडे पाहा`. `निर्णय घेण्याची क्षमता नसलेले पुळचट मुख्यमंत्री सध्या मुख्यमंत्री पदावर बसले आहेत.
Nov 6, 2012, 08:52 AM ISTमुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना `दे धक्का`
मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. राज्य सरकारनं पुणे महापालिकेला विश्वासात न घेता महापालिकेची हद्द वाढवली आहे. राज्य सरकारनं परस्पर २८ गावांचा समावेश महापालिका हद्दीत केलाय.
Oct 18, 2012, 07:40 PM ISTदादा-बाबांच्यामध्ये दरी, फोन घेण्यास टाळाटाळ
अजित पवार हे गेल्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संपर्कातच नव्हते,अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठ दिवसांत अजितदादांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा फोनच उचलला नव्हताही अशी माहिती आहे.
Sep 26, 2012, 01:11 PM IST६४वा मराठवाडा मुक्तिदिन
आज 64 वा मराठवाडा मुक्तीदिन सोहळा साजरा कऱण्यात येतोय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत हा सोहळा पार पडला. हैदराबादच्या निजामाच्या क्रूर राजवटीतून मुक्तीसाठी शेकडो जणांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं.
Sep 17, 2012, 03:51 PM ISTशिवाजी पार्कच का? भेंडीबाजार का नाही?- उद्धव
मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसर आणि निवासी भागाला हेरिटेज दर्जा देण्याप्रकरणी हेरीटेजचा दर्जा मराठी वसाहतींनाच का? असा सवाल उद्धव यांनी केला आहे. शिवाजी पार्क परिसर हेरिटेज झाल्यास त्याचा फटका या भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला बसणार आहे.
Sep 2, 2012, 11:33 AM ISTनिचरा पैशाचा की कचऱ्याचा...
मुंबई महापालिकेनं राबवलेल्या ‘ब्रिमस्टोवॅट’ प्रकल्पाचा खर्च कसा वाढला याबद्दल चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिलंय.
Jul 17, 2012, 10:28 AM ISTआदर्श घोटाळा : विलासराव हाजीर हो...SSS
मुंबईतील आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची आज पुन्हा साक्ष होणार आहे. त्यासाठी ते चौकशी आयोगासमोर हजर झाले आहेत.
Jun 27, 2012, 12:52 PM ISTविलासरावांनी फोडले अशोक चव्हाणांवर खापर!
वादग्रस्त 'आदर्श'च्या इमारतीसाठी जमीन देण्याचा आदेशाच्या फाईल्स मुख्य सचिवांनीच तपासल्या होत्या, असे सांगून राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनीही या प्रकरणी महसूल खात्याकडे बोट दाखवत मी नाही त्यातला असे दाखवून दिले आहे.
Jun 26, 2012, 07:02 PM ISTमोरे कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन
मंत्रालयात लागलेल्या आगीत मुख्यमंत्र्यांचे जमादार मोहन मोरे आणि तुकाराम मोरे यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोघांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केलं.
Jun 24, 2012, 07:31 PM ISTपवारांच्या प्रस्तावानं भुजबळांना दणका
मंत्रालयाच्या जागी सरकारनंच नवी इमारत बांधावी अशी सूचना करत शरद पवारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या जुन्या प्रस्तावाला मूठमाती दिलीय.
Jun 23, 2012, 07:46 AM ISTमुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार
मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.
Jun 22, 2012, 04:57 PM ISTमंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही
राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे
Jun 22, 2012, 04:27 PM ISTमंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार
मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.
Jun 22, 2012, 04:17 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन
ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.
Jun 22, 2012, 02:36 PM IST