prithviraj chavan

बोलणी शिवाय काँग्रेस आघाडीची संपली बैठक

दोन्ही काँग्रेस आघाडीबाबतमधील जागा वाटपांचा घोळ संपविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या  वर्षा बंगल्यावर सुरु असलेली बैठक चर्चेशिवाय संपली. मात्र, आघाडीची बोलणी पुन्हा सायंकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले.

Sep 23, 2014, 11:39 AM IST

दोन्ही काँग्रेस आघाडीबाबत आज चर्चा - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रात्री उशीरा पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीकडे असलेल्या ११४ जागांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. तसंच आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत राष्ट्रावादी काँग्रेस सोबत बैठक घेऊन आघाडीबाबत महत्त्वाची भूमिका घेणार असल्याचंही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. 

Sep 23, 2014, 08:24 AM IST

मी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री होणार नाही - अजित पवार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडीबाबत बिघाडी होण्याचे संकेत अधिक गडद झाले आहे. दोन्ही पक्षामधील वाद विकोपाला जाताना दिसत आहे. पृथ्वीराज चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार नाही, असे स्फोटक विधान अजित पवार यांनी केलेय.

Sep 18, 2014, 10:53 PM IST

मुख्यमंत्री चव्हाण यांची कोणी केलेय कोंडी?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रसची निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मात्र खुदद् पृथ्वीराज बाबांना कुठल्या मतदारससंघातून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी दक्षिण कराडमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र तिथे स्वपक्षाबरोबरच, मित्रपक्ष आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांची पूर्णपणे कोंडी केली आहे.

Sep 16, 2014, 08:30 PM IST

'महामुख्यमंत्री कोण?' – पृथ्वीराज चव्हाणांच्या कारभाराचा आढावा

यंदाच्या निवडणुकीत कुणाची प्रतिष्ठा सर्वाधिक पणाला लागली असेल तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची... आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं आणि विरोधकांवर मात करत, पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवायचं, अशी अडथळ्यांची शर्यत त्यांना पार करायचीय... 'महामुख्यमंत्री कोण?' या आमच्या विशेष सीरिजमध्ये पृथ्वीबाबांच्या कारभाराचा आढावा...

Sep 15, 2014, 08:59 PM IST

मुख्यमंत्री आयसीयूमधील पेशंटप्रमाणे अस्थिर - उद्धव ठाकरे

सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांचं मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनलं असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र सोडण्यात आलं असून 'अतिदक्षता विभागातील पेशंट अनेकदा अर्धग्लानीत जाऊन असंबद्ध बरळतो तसं काहीसं राज्याच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांचं झालं असल्याचं' लेखात म्हटलं आहे. 

Sep 15, 2014, 05:11 PM IST

भाजपचे हिटलरप्रमाणे पाऊल - मुख्यमंत्री चव्हाण

देशात मोदींचे भाजप सरकार हिटलप्रमाणे पाऊल टाकत आहे. भाजपमध्ये ज्येष्ठांना काहीही किंमत नाही, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

Aug 27, 2014, 09:11 AM IST

मी मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही - मुख्यमंत्री

 सोलापुरातल्या हुल्लडबाजीसारखा प्रकार पुन्हा होणार नाही, असं आश्वासन जोपर्यंत नरेंद्र मोदी देत नाहीत, तोपर्यंत मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय.

Aug 23, 2014, 07:11 PM IST