पवार-चव्हाणांमध्ये तू तू... मै मै
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसमध्ये मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उडी घेतली आहे. पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय. तर मुख्यमंत्र्यांनीही पवारांच्या टीकेला चोख उत्तर दिलंय.
Jun 3, 2012, 08:43 AM ISTमुख्यमंत्र्यांनी साहेबांना केले टार्गेट
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली असली तरी त्यांच्या निशाण्यावर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार असल्याचे दिसून आले आहे. निर्यातीबाबत चुकीच्या धोरणामुळं राज्याला फटका बसत असून शेतक-यांचं नुकसान होत असल्याचं चव्हाण यांनी कोल्हापूर येथे सांगितले.
May 12, 2012, 03:46 PM ISTशिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचं प्रकाशन
१६४६ ते १६७९ या कालावधीत शिवाजी महाराजांनी मोडी लिपीत लिहिलेल्या २८ मूळ पत्रांचं देवनागरी लिपीत भाषांतर करण्यात आलंय. या पत्रांच्या भाषांतरामुळं ती इतिहास संशोधकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनीही समजू शकणार आहेत.
Apr 6, 2012, 11:13 AM ISTउद्धवच 'अजित' की 'पृथ्वीं'चे राज ?
महापालिकांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
Feb 15, 2012, 02:41 PM ISTअजित पवार-पृथ्वीराज चव्हाणांचा कलगीतुरा
पुण्यात काँग्रेसचा स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनाच नाहीय. त्यामुळे त्यांनी निवडणुकीआधीच आघाडीची भाषा सुरू केलीय. पण त्याचबरोबर अर्थखातं कुणाच्याही ताब्यात असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय काहीच होत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना लगवाला आहे.
Feb 10, 2012, 05:45 PM ISTएमएमआरडीएचा सायकल ट्रॅक... कशासाठी ?
साडेसहा कोटी रुपये खर्चुन बांधण्य़ात आलेल्या या सायकल ट्रॅकवर एकही सायकल धावलेली नाही. एमएमआरडीएनं मोठा गाजावाजा करीत हा ट्रॅक बांधला. मात्र त्याचा कोणताही उपयोग होत नसल्याचं उघ़ड झालं आहे.
Jan 14, 2012, 08:50 PM ISTआघाडीचा निर्णय लांबणीवर
संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुनच सोमवारी आघाडीचा निर्णय घेण्यावर एकमत झालं आहे.
Jan 8, 2012, 12:13 AM ISTडॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्यास पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी आज येथे दिली.
Dec 31, 2011, 05:23 PM ISTकिस्सा मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट पत्राचा
बी जे मार्केटमध्ये एक रुपये चौरस फुटानं दोन हॉल्स भाड्यानं देण्यासंदर्भात एक प्रस्ताव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं जळगाव महापालिकेला पाठवला. मात्र हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयातून 16 नोव्हेंबरला चक्क मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसह आदेशाचं एक पत्र आयुक्तांना आलं.
Dec 16, 2011, 12:56 PM ISTनिवडणुकीची धुमशान
राज्यात नगरपालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि विरोधकांनी मरगळ झटकली. कारण वाढती महागाई, अण्णा फॅक्टर यामुळे कॉंग्रेस आघाडी बॅकफूटवर जाणार अस वाटत होतं. पण आता निवडणूक निकालानंतर वेगळं चित्र समोर आलं.
Dec 15, 2011, 11:24 AM ISTअजित पवारांचे मुख्यमंत्री 'टार्गेट'
'ज्यांना नगरपालिकेची माहिती नाही, त्यांनी नगरपालिकेचा विकास करण्याची भाषा करु नये' असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता लगावला.
Dec 9, 2011, 11:09 AM ISTराणेंच्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर भाजप तसंच एनजीओकडून सुपारी घेतल्याच्या नारायण राणेंनी केलेल्या आरोपाचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी समर्थन केलंय. काँग्रेसला विरोध आणि एका 'विशिष्ट पक्षाला फायदा' असं अण्णा वागत असल्याचा दावा केलाय.
Dec 5, 2011, 02:50 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांसमोर धामणगावच्या सभेत आत्महत्येचा प्रयत्न करणा-या अरुण सभाणे या शेतक-याची प्रकृती गंभीर आहे. त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलय. कापसाच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी सभाणे यांनी केली होती.
Dec 4, 2011, 05:14 PM IST‘अण्णांनी पातळी सोडून बोलायला नको होतं’
अण्णांनी पातळी सोडून बोलायला नको होतं असं वक्तव्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे इथे केलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांवर दिल्लीत झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी एकही मारा असा प्रति प्रश्न पत्रकारांना केला होता. त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया कालपासून सर्वत्र उमटत आहेत.
Nov 25, 2011, 01:43 PM IST