raigad

महाड पुलाचे काम रखडल्याने गडकरींनी व्यक्त केली दिलगिरी

केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केली. हे काम रखडल्यानं रायगडकरांना त्रास झाल्याबददल दिलगिरी व्यक्त केली. त्याचवेळी कामाची गती आता वाढल्यानं समाधान व्यक्त केलं.

Mar 3, 2017, 06:05 PM IST

सावित्री नदी पुलाचे बांधकाम जून पूर्वी पूर्ण : गडकरी

रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री नदीवरील अपघातग्रस्त पुलाच्या शेजारीच नवीन पूल बांधण्याचे काम युदधपातळीवर सुरू आहे. हे काम येत्या जून पूर्वी पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Mar 3, 2017, 06:00 PM IST

खरं कारण! म्हणून मुख्यमंत्री रायगडावर गेले शिवाजी महाराजांच्या दर्शनाला

छत्रपतींचा आशीर्वादाचा प्रभाव दिसणार.... कमळ फुलवणारच, परिवर्तन तर होणारच! अशा जाहिराती निवडणुकीपूर्वी भाजपकडून दिल्या जात होत्या. पण भाजपने काल हद्दच केली. मुंबईत निवडणूक जिंकल्यावर देण्यात आलेल्या जाहिरातीत भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होती. याचा धसका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि आज थेट मंत्र्यांचा लवाजमा घेत रायगड किल्ला गाठला. अशीच प्रतिक्रिया सोशल मीडियावर रंगत आहे.

Feb 25, 2017, 04:26 PM IST

शिवरायांच्या प्रेरणेतून राज्याचा विकास करणार : मुख्यमंत्री

रायगडावर शिवछत्रपती महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला राज्यात चांगला विजय मिळाला असून यापुढे देखील राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत राहणार, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Feb 25, 2017, 01:57 PM IST