railway minister

रेल्वेमंत्री गोयल यांना प्रवाशाने सुनावलं, 'तुमच्यापेक्षा प्रभू चांगले होते'

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे अपघात टाळण्यात अयशस्वी ठरले असले तरी ते आणि त्यांचं मंत्रालय सोशल मीडियावर अतिशय सक्रिय होतं. लोक फक्त माजी रेल्वेमंत्री प्रभु यांना रेल्वे समस्या ट्विट करायचे आणि लोकांना लगेच ते प्रतिक्रिया द्यायचे. पण प्रभू यांच्या राजीनाम्यानंतर रेल्वे मंत्रालय देखील आळशी झालं. 

Oct 24, 2017, 03:59 PM IST

मोदींना राज ठाकरेंनी दिला थेट इशारा, बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही!

शहर आणि उपनगरातील रेल्वेची स्थिती इतकी भीषण आहे आणि बुलेट ट्रेन्स काय आणताय? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी, जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल. आम्ही बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.

Sep 30, 2017, 12:11 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटना : रेल्वेमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिले आहेत. दरम्यान, आजच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

Sep 30, 2017, 11:40 AM IST

दुर्घटनेनंतर जाग, एलफिन्स्टन स्टेशनवरील नव्या पुलाला मंजुरी

एलफिन्स्टन पुलावर झालेल्या प्रचंड गर्दीनंतर चेंगराचेंगरी झाली आणि २२ जणांना आपला प्राण गमवावा लागला तर ३० जण जखमी झालेत. या दुर्घटनेनंतर नव्या पुलाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या दुर्घटना घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

Sep 30, 2017, 11:09 AM IST

मुंबई-लातूर एक्स्प्रेसला प्रश्न सोडविण्याचे नव्या रेल्वेमंत्र्याचे आश्वासन

मुंबई-लातूर एक्स्प्रेसचे काही महिन्यांपूर्वी कर्नाटकातील बिदरपर्यंत विस्तारीकरण करण्यात आले होते. त्यामुळे लातूरकरांनी या विस्तारीकरणाचा तीव्र विरोध करीत वेगवेगळी आंदोलनं केली होती. पुन्हा या गाडीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान नव्या रेल्वेमंत्र्यांनी लातूरकरांना प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिलेय.

Sep 12, 2017, 09:26 PM IST

बुलेट ट्रेनचं भूमीपूजन २२ सप्टेंबरला तर उद्घाटन २०२२ला

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन 14 सप्टेंबरला होणार आहे.

Sep 11, 2017, 08:52 PM IST

ट्रेनमध्ये टीप मागणे ४८ तासांत बंद करा; पीयूष गोयलांचे फर्मान

सुरेश प्रभू यांच्याकडूने रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी येताच नवनिर्वाचीत रेल्वमंत्री पीयूष गोयल चांगलेच कामाला लागले आहेत. सूत्रे हाती येताच गोयल यांनी पहिला दणका रेल्वेप्रवासादरम्या प्रवाशांकडून घेतल्या जाणाऱ्या टीप आणि अतिरिक्त पैसे घेणऱ्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

Sep 10, 2017, 04:55 PM IST

रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची राजीनाम्याची तयारी

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. मागील २ रेल्वे अपघातामुळे प्रभूंनी राजीनामा देऊ केला आहे.

Aug 23, 2017, 03:10 PM IST

साईभक्तांसाठी खुशखबर, शिर्डी ते दादर विशेष रेल्वे

साईभक्तांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेच्यावतीने उद्यापासून साईनगर शिर्डी ते दादर ही विशेष साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू दाखविणार या गाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.

Jul 29, 2017, 07:11 PM IST

बुलेट ट्रेन २०२२ मध्ये !

 

मुंबई :  मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनला २०२२ चा मुहूर्त लाभणार आहे. सुमारे ९७ हजार कोटी रुपयांचा या प्रकल्पातील प्रारंभीचे स्थानक म्हणून बीकेसीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

Jun 6, 2017, 08:47 PM IST