ratnagiri

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती

आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय. 

Jul 14, 2017, 02:44 PM IST

झी २४ तास इफेक्ट : सुकोंडी-वाघिवणे धरणाची गळतीची अधिकाऱ्यांकडून दखल

झी २४ तासने दापोली तालुक्यातील सुकोंडी-वाघिवणे धरणाची बातमी दाखवल्यानंतर या धरणाची गळती थांबवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील, अशी माहिती जल सिंचन जलसंधारण उपविभागाच्या अधिका-यांनी दिली.

Jul 13, 2017, 09:30 AM IST

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच विमानसेवा

येथील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे. रत्नागिरी विमानतळाचं काम सध्या प्रगतीपथावर असून 2018 मध्ये या विमानतळाची सेवा सुरू होईल, अशी माहिती तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी दिलीय.

Jul 13, 2017, 08:14 AM IST

पूरग्रस्तांना मदत करतांना रत्नागिरीचा जवान शहीद

अरुणाचल प्रदेशमधील पूरग्रस्तांना मदत करताना वायुदलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील फ्लाईट इंजीनिअर राजेंद्र गुजर बेपत्ता झाले होते. शनिवारी त्यांचा मृतदेह सापडला. राजेंद्र गुजर हे मंडणगड तालुक्यातील पालवणी-जांभुळनगर इथले रहिवासी आहेत. त्यांचं पार्थिव आज त्यांच्या गावी आणण्यात येईल. तिथे त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Jul 10, 2017, 01:16 PM IST

संघर्षाला हवी साथ : एका कोकणकन्येचा संघर्ष!

एका कोकणकन्येचा संघर्ष!  

Jul 7, 2017, 09:25 PM IST

खेम धरणाचं होणार स्ट्रक्चरल ऑडिट

खेम धरणाचं होणार स्ट्रक्चरल ऑडिट 

Jul 7, 2017, 09:18 PM IST

संघर्षाला हवी साथ : एका कोकणकन्येचा संघर्ष!

दहावीच्या परीक्षेत यंदाही कोकण अव्वल ठरलं. आज संघर्षाला हवी साथमध्ये एका कोकणकन्येचा संघर्ष... दापोलीतल्या जागृती जयेंद्र मंडपेला दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के मिळवलेत... कुणाचाही खंबीर पाठिंबा नसताना जागृतीनं मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे.

Jul 7, 2017, 07:32 PM IST

उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेचा मृत्यू, रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ

साप चावलेल्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घातल्याची घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे. 

Jul 5, 2017, 07:49 AM IST

रत्नागिरीत कारने ५ गाड्यांना चिरडले

एसटी स्टँण्डसमोर अपघाताचा भयानक थरार पाहायला मिळाला. कुवारबावहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या कारने पाच वाहनांना चिरडत नेले. 

Jul 5, 2017, 07:44 AM IST