riteish deshmukh

रितेश देशमुखच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन!

देशमुख आणि भगनानी कुटुंबात एक आनंदाची बातमी आहे. अभिनेता रितेश देशमुखचा मोठा भाऊ धीरज देशमुखला मुलगा झालाय. रितेशनं ‘ट्विट’करून ही माहिती दिलीय. विशेष म्हणजे माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म आणि आता या त्यांच्या नातवाचा जन्म एकाच दिवशी म्हणजे 25 मेला झाला.

May 28, 2014, 06:50 PM IST

सलमानने केले रितेश देशमुखच्या ‘yellow’बद्दल ट्विट

बॉलिवुडचा दबंग खान सलमान खानने आपला मित्र धूम-३ चं जोरदार प्रमोशन बिग बॉस सिझन ७ मध्ये केले. त्यासाठी आमीर खानची धूममधील हॅट घातली आणि धूमचे टायटल साँगही गायलं. आता हा दिलदार मित्र आणि हळवा माणूस रितेश देशमुखसाठी पुढे आला आहे. रितेश देशमुखचा आगामी चित्रपट ‘यलो’बद्दल सलमान खानने ट्विट केले आहे.

Feb 20, 2014, 09:32 AM IST

फिल्म रिव्ह्यू : `ग्रॅन्ड मस्ती`पेक्षा हास्यनिर्मिती वेगळीही असते!

२००४ साली आलेल्या ‘मस्ती’ सिनेमाचा सिक्वल ‘ग्रँड मस्ती’... चित्रपट निर्माते इंद्र कुमार यांना या चित्रपटाची निर्मिती करताना कथेची आवश्यकता अजिबात भासलेली नाही... तुम्ही ‘मस्ती’ पाहिला असेल तर तुम्हालाही या सिनेमात नवीन कथा पाहायला मिळेल, अशी आशा ठेवण्याची गरज नाही.

Sep 14, 2013, 04:10 PM IST

सलमानचं मराठी `लई भारी` - रितेश देशमुख

या वर्षात सलमान खान ‘लई भारी’ या त्याच्या पहिल्या वहिल्या मराठी सिनेमात काम करत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत रितेश देशमुखही आहे. आणि रितेश देशमुख सध्या सलमान खानच्या मराठी भाषेची तारीफ करतोय.

Sep 2, 2013, 04:22 PM IST

`लई भारी` - सलमान खान मराठी सिनेमात

गेल्या २० वर्षांहून जास्त काळ बॉलिवूड गाजवल्यावर आणि बॉक्स ऑफिसवर वेगवेगळे रेकॉर्ड्स केल्यावर सलमान खान आता मराठी सिनेमा करण्यासाठी सज्ज झाला आहे. या बातमीमुळे सलमान खानचे मराठी फॅन्स आनंदी झाले आहेत.

Aug 13, 2013, 05:10 PM IST

जेनेलिया मराठी सिनेमांच्या प्रेमात

‘बालक पालक’ या सिनेमाद्वारे रितेश देशमुख मराठी सिनेमाच्या निर्मितीमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमामुळे मराठी सिनेमा आणखी एक पाऊल पुढे टाकेल, अशी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा हिला आशा आहे.

Oct 23, 2012, 01:27 PM IST

रितेश-जेनेलियाच्या रिसेप्शनला ऐश्वर्या उपस्थित

मराठी आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रितेश- जेनेलियाच्या रिसेप्शनलाही समस्त बॉलिवूड हजर होतं. यावेळी पहिल्यांदाच ऐश्वर्या राय-बच्चन आपले सासू-सासरे अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत उपस्थित होती.

Feb 7, 2012, 11:59 AM IST

रितेशच्या विवाहाला शाहरुख,अभिषेक आणि राज ठाकरे

आज रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांचा विवाह झाला. बॉलिवूडमधला एक शानदार विवाह सोहळा ‘ग्रँड हयात’ येथे मोठ्या थाटात पार पडला. या लग्नाला बॉलिवूडच्या स्टार्ससह राजकारणातल्या हस्तीही उपस्थित होत्या.

Feb 3, 2012, 06:05 PM IST