sachin tendulkar

सचिनच्या उंचीवर जाऊ नका, तो आहे ‘टायगर’ - हेडन

सचिन तेंडुलकरच्या उंचीवर जाऊ नका ५ फु़ट ६ इंच उंचीच्या या छोट्या फलंदाजात ‘टायगर’ दडलेला आहे, हे उद्गार आहेत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मँथ्यू हेडन याचे. विमलकुमार यांच्या `सचिन क्रिकेटर आँफ द सेंच्युरी` या पुस्तकात हेडनने लेख लिहिला आहे. त्यात सचिनवर हेडनने स्तुतिसुमने उधळलीत.

Feb 28, 2013, 06:36 PM IST

तेंडुलकर-कांबळीचा विक्रम वाळवीनं पोखरलाय

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी शारदाश्रमकडून खेळतांना ही ६६४ रन्सची रेकॉर्ड पार्टनरशीप केली होती. या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरनं नॉट आऊट ३२६ रन्स आणि विनोद कांबळीनं नॉट आऊट ३४९ रन्सची इनिंग खेळली होती. मात्र, या दोघांचा हाच विक्रम वाळवीनं पोखरलाय.

Feb 27, 2013, 10:08 PM IST

सचिनचे ८१ रन्सवर आऊट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा शतकाने हुलकावणी दिलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरला कसोटी कारकिर्दीतील ५२ वे शतक पूर्ण करू शकला नाही. सचिन नॅथन लिऑनच्या गोलंदाजीवर ८१ रन्सवर बोल्ड झाला.

Feb 24, 2013, 11:29 AM IST

भारत X आस्ट्रेलिया : आज रंगतेय पहिली टेस्ट मॅच

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हायप्रोफाईल टेस्ट सीरिजला आजपासून चेन्नई टेस्टनं सुरुवात होतेय. दोन्ही देशातील टेस्ट मॅचेस या क्रिकेटप्रेमीसाठी स्पेशल ट्रीट ठरत असतात. ऑस्ट्रेलियात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशानं धोनीची टीम मैदानात उतरेल. तर २००४ नंतर भारताला त्यांच्याच देशात पराभूत करण्यासाठी क्लार्क अॅन्ड कंपनी प्रय़त्नशील असेल.

Feb 22, 2013, 08:46 AM IST

'...स्वत:बद्दल शाश्वती नव्हती, म्हणून निवृत्ती'

२०१५ च्या वर्ल्डकप टीममध्ये मी स्वत:ला पाहू शकलो नाही त्यामुळेच टीम इंडियाचं हित लक्षात घेऊन वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं म्हटलंय.

Feb 5, 2013, 09:02 AM IST

सचिन तेंडुलकर तिरुपती बालाजीच्या चरणी

संपूर्ण भारतात ज्या एका देवाची मोठ्या श्रद्धेनं-भक्तीनं पूजा केली जाते आणि ज्या देवाच्या दर्शनाला जगाच्या कानाकोप-यातून भाविक येतात, त्या तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायला आज क्रिकेटचा देव पोहोचला.

Feb 2, 2013, 03:52 PM IST

सचिनसाठी `बालक-पालक`चं स्पेशल स्क्रिनिंग

रितेश देशमुख निर्मित ‘बालक-पालक’ सिनेमानं अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. सचिन तेंडूलकरही त्याला अपवाद ठरलेला नाही. नुकतंच, मुंबईमध्ये खास सचिनसाठी या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं.

Jan 26, 2013, 12:19 PM IST

आशाताईंनी सचिनला दिली अनोखी भेट

क्रिकेटचा बादशहा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी अनोखी भेट दिली आणि सचिन भलताच खूश झाला. यावेळी आशाताईंनी सचिनचे खूप कौतुक केले.

Jan 23, 2013, 12:18 PM IST

वडिलांच्या नावामुळे अर्जुनची लागली वर्णी?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची अंडर-१४ मधील टीममध्ये सिलेक्शन झाल्याने, ज्युनिअर क्रिकेटमध्ये ज्यांचे सिलेक्शन झालं नाही.

Jan 15, 2013, 03:15 PM IST

अर्जुनला स्पेशल ट्रीटमेंट नको – सचिन

‘अर्जुनला मनमोकळेपणानं खेळू द्या. त्याच्याकडे फक्त सचिनचा मुलगा म्हणून पाहू नका’, असं आवाहन सचिन तेंडुलकरनं आपल्या चाहत्यांना केलंय.

Jan 12, 2013, 10:13 AM IST

... आणि सचिन तेंडुलकर आपल्या पत्नीशी खोटं बोलला

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कार विकत घेण्याबाबत त्याची पत्नी अंजलीशी खोटं बोलला होता.

Jan 11, 2013, 10:41 AM IST

जाहले तेंडुलकरचे आगमन!

आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अर्जुन सचिन तेंडुलकरनं मुंबई ‘अंडर फोर्टीन’च्या टीममध्ये एन्ट्री मिळवलीय.

Jan 10, 2013, 04:54 PM IST

वन-डे निवृत्तीनंतर सचिनने करून दाखवलं

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर रणजी सामन्यात शानदार शतक करून टीकाकारांची बोलती बंद केली आहे.आपल्यामध्ये किती क्रिकेट शिल्लक आहे, हे दाखवून दिलंय.

Jan 7, 2013, 06:52 AM IST

टीम इंडिया जोरदार कमबॅक करेल - सचिन

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज प्रथमच मीडियासमोर आला. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध जोरदार कमबॅक करेल, असा विश्वासही त्यांने व्यक्त केलाय.

Jan 2, 2013, 01:44 PM IST

२०१२ हे वर्ष वाईट घटनांचं – लता मंगेशकर

दिल्लीमध्ये घडलेली सामूहिक बलात्काराची घटना आणि सचिन तेंडुलकरची निवृत्ती या दोन घटना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनाही चटका लावून गेल्यात. २०१२ हे वर्ष वाईट घटनांचं होतं, असं व्यथित लतादीदींनी म्हटलंय.

Dec 27, 2012, 06:34 PM IST