sachin tendulkar

पुस्तक उच्चारणार अंधांसाठी सचिनची गाथा

सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारीत ध्रुवतारा या पुस्तकाच्या ऑडीओ स्वरुपातल्या आवृत्तीचं पुण्यात प्रकाशन झालं. क्रिडा पत्रकार संजय दुधाणे लिखीत ध्रुवतारा पुणे ब्लाइंड स्कुलच्या विद्यार्थ्यांना ऑडीओ बुक स्वरुपात आणलं आहे.

Oct 15, 2012, 11:37 PM IST

मास्टर ब्लास्टरच्या 'महानायकाला' शुभेच्छा...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आज बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांच्या चांगल्या आरोग्याच्या आणि सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Oct 11, 2012, 10:27 PM IST

खासदार सचिनचा स्पोर्टस् अजेंडा... मास्टर प्लान सादर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं राज्यसभेचा खासदार म्हणून देशातील क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी ‘मास्टर प्लान’ तयार केलाय

Oct 9, 2012, 02:15 PM IST

सचिनच्या मनात निवृत्तीचा विचार

सचिनने क्रिकेटला अलविदा करावं याबाबत माजी क्रिकेटपटू, क्रिकेटपंडित आणि माडिया नेहमीच चर्चा करत असते. मात्र आता खुद्द मास्टर-ब्लास्टरच्या मनातच रिटायर्डमेंटचे विचार सुरू झाले आहेत.

Oct 5, 2012, 01:40 PM IST

यजमान सचिनच्या घरी ब्रायन लारा

वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने अचानक क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या घरी जाऊन त्याला भेट देत आश्चर्याचा धक्का दिला. या दोन महान फलंदाजांच्या भेटीचा कार्यक्रम पूर्व नियोजित नसल्याची माहिती समोर आली आहे.

Sep 23, 2012, 04:57 PM IST

जेव्हा सचिन भेटायला बोलावतो...

तुम्हाला सचिन तेंडुलकरचा फोन आला आणि त्यानं तुम्हाला भेटायला बोलावलं तर...कल्पना करा तुमची काय अवस्था होईल....अहमदनगरच्या चित्रकार आणि शिल्पकार असलेल्या प्रमोद कांबळेंना असाच फोन आला आणि त्यांना सचिननं भेटायलाही बोलावलं... काय झाली असेल त्यांची अवस्था

Sep 17, 2012, 10:12 PM IST

सचिनवर दबाव टाकू नका - लारा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दबाव टाकू नका. त्याला ज्यावेळी निवृत्ती घ्यायची असेल तेव्हा तो घेईल. सध्या सचिन चागंला खेळत आहे, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यांने व्यक्त केले आहे.

Sep 16, 2012, 02:52 PM IST

यशात गुरु आणि मित्रांचा वाटा - सचिन तेंडुलकर

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं साधला नाशिककरांशी मनमुराद आनंद. यशामध्ये कुटुंबीय, गुरु आणि मित्रांचा महत्वाचा वाटा असल्याची कबुली दिली. सचिनचा नाशिकमध्ये नागरी सन्मान करण्यात आला. त्यावेळी तो बोलत होता.
सचिन तेंडुलकरनं यावेळी दिलखुलास मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सगळे महत्वाचे निर्णय हे साहित्य सहवासमध्येच घेतल्याचही त्यानं यावेळी सांगितलं.

Sep 6, 2012, 06:58 PM IST

पाकविरूद्ध सचिन खेळल्यास त्याचं काय?- आशाताई

राज ठाकरे आणि आशाताई यांच्या वादात आता त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ओढलं आहे.

Sep 6, 2012, 02:28 PM IST

क्रिकेटचा `देव` का कोपला?

सचिनच्या फॉर्मची चर्चा सध्या रंगत आहे. मात्र यापूर्वी सचिननं अशा चर्चेला आपल्या धावांनी उत्तर दिलं होतं. मैदानावरही त्याची एकाग्रता तो ढळू देत नसे. बेंगळुरु कसोटीत मात्र बाद झाल्यावर सचिन काहीसा रागावलेला दिसला. अनेकजण आता सचिनच्या रागाचं कारण शोधू पहात आहेत.

Sep 4, 2012, 08:08 AM IST

सचिनच्या खेळावर वयाचा परिणाम – गावस्कर

भारतीय टीमचे माजी कॅप्टन सुनील गावस्करनी सचिनच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उभ केलं आहे. सचिनच्या खेळावर त्याच्या वयाचा परिणाम होत असल्याचं मत गावस्करांनी यावेळी म्हटलंय.

Sep 1, 2012, 08:41 PM IST

बॅटिंगचा कंटाळा येईपर्यंत खेळणार’- सचिन

‘द वॉल’ राहुल द्रविड आणि ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मणनं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच पुन्हा एकदा सचिन कधी निवृत्ती घेणार? या प्रश्नावर सचिनसोडून इतरांचा खल सुरू झाला.

Aug 30, 2012, 04:42 PM IST

भारतीय क्रिकेटर्सची आयसीसी पुरस्कारांमध्ये पीछेहाट

गेल्या वर्षभरात वाईट कामगिरी केल्यामुळे भारतीय कसोटी टीमचा एकही सदस्य आयसीसीच्या टेस्ट टीममध्ये आपलं नाव मिळवू शकला नाही. ‘वर्षातील सर्वश्रेष्ठ टेस्ट क्रिकेटर’ आणि ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटर’ या दोन्ही पुरस्कारांमध्येही एकाही भारतीय खेळाडूचं नाव नाही. इंग्लंड आणि द. आफ्रिकेच्या खेळाडूंचा मात्र या टीममध्ये दबदबा आहे.

Aug 30, 2012, 04:33 PM IST

नवी इनिंग!

एक जगातली महान क्रिकेटर ...तर दुसरी बॉलीवूडमधील एक दिग्गज अभिनेत्री...आपल्या क्षेत्रात त्यांनी वेगळ स्थान निर्माण केल असून आता एका वेगळ्या क्षेत्रात त्यांनी नव्याने पाऊल टाकलंय..देशातील जनतेच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत..

Aug 10, 2012, 11:11 PM IST

सचिन, रेखानं पहिल्या दिवशी काय केलं?

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. राज्यसभेसाठी निवड झालेले सदस्य सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा गणेशन यांनी पहिल्या दिवशी काय केले, असा प्रश्न पडला असेल ना? सचिन आणि रेखाने गोंधळ पाहीला. असे असले तरी या गदारोळात या दोघांचा प्रभाव दिवसभर राहिला. सचिन आणि रेखाला भेटण्यासाठी उपस्थित सर्व खासदार भेटण्यासाठी आतूर झाले होते.

Aug 9, 2012, 12:44 PM IST