sairat

'इंग्रजीमध्ये सांगू का' म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये मिळाले एवढे मार्क

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेल्या आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूला दहावीच्या परीक्षेत ६६.४० टक्के मार्क मिळाले आहेत. मराठीमध्ये सांगितलेलं कळत नाही? इंग्रजीमध्ये सांगू का हा आर्चीसा सैराटमधला डायलॉग लोकप्रिय झाला होता. 'इंग्रजीमध्ये सांगू का' म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये ५९ मार्क मिळाले आहेत.

Jun 13, 2017, 04:09 PM IST

सैराटमधील प्रिन्स दादा सूरज पवारच्या कुटुंबीयांना मारहाण

 या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील करमाळा तालुक्याती पोफळज या गावात मारहाणीची प्रकार घडला आहे.

May 7, 2017, 03:26 PM IST

लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये आर्ची, परश्याचा मेणाचा पुतळा

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमातून रातोरात स्टार बनलेले आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचे पुतळे लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये बनवण्यात आलेत. 

May 1, 2017, 01:50 PM IST

सोशल मीडियावर सैराटची वर्षपूर्ती साजरी

मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणाऱ्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमा प्रदर्शित होऊन आज एक वर्ष पूर्ण होतंय. सोशल मीडियावर सैराटच्या वर्षपूर्तीनिमित्त मेसेजही व्हायरल होतायत. 

Apr 29, 2017, 03:39 PM IST

सैराट फेम आकाश ठोसरच्या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सैराट फेम आकाश ठोसरच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झालाय. बॉलीवूडचा दबंग खान सलमानने ट्विटवरुन हा फर्स्ट लूक रिलीज केलाय.

Apr 10, 2017, 01:35 PM IST

'सैराट'च्या आर्चीची छेड काढणाऱ्या तरुणाला अटक

मराठी सिनेसृष्टीत भव्यदिव्य यश मिळवणाऱ्या सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु अर्थात आर्चीसोबत छेडछाड करण्यात आल्याची घटना घडलीये. याप्रकरणी संबंधित तरुणाला अटक करण्यात आलीये. 

Mar 23, 2017, 04:20 PM IST

झी चित्र गौरव पुरस्कारांवर 'सैराट'ची मोहोर

मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय मानाचा समजला जाणारा, चित्रपटसृष्टीसह अवघ्या रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात दिमाखदार पद्धतीने पार पडला. आपल्या हळव्या प्रेमकथेने आणि झिंगाट गाण्यांनी सर्वांनाच वेड लावणा-या सैराट चित्रपटाची जादू याही पुरस्कार सोहळ्यावर बघायला मिळाली. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांसहित आठ पुरस्कारांवर ‘सैराट’ने आपलं नाव कोरलं. डोळे दिपवून टाकणारा रंगमंच, त्यावर सादर होणारे रंगतदार नृत्याविष्कार आणि प्रेक्षकांमधून वाहणारा सळसळता उत्साह अशा वातावरणात उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्याचं आकर्षण ठरला तो जीवनगौरव पुरस्कार. आपल्या सोज्वळ व्यक्तिमत्वाने आणि सालस अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी रसिकांचीही मने जिंकणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.

Mar 19, 2017, 02:51 PM IST

'झिंगाट' गाण्यावरून रक्तपात, ९ जण गंभीर जखमी

 संपूर्ण महाराष्ट्राला झिंग लावणारे 'झिंग झिंग झिंगाट'  गाणे एका लग्नाच्या पार्टीत मोठया रक्तपाताचे कारण ठरले. झिंगाट गाणे वाजवायचे की, जय जय महाराष्ट्र यावरून झालेल्या वादातून दोन गटांनी परस्परांवर चाकू, कु-हाडीने वार केले. यात एकूण नऊ जण जखमी झाले. 

Mar 9, 2017, 08:04 PM IST

कन्नड सैराट 'मनसू मल्लीगे' चा प्रोमो व्हायरल

कन्नड सैराटचा प्रोमो रिलीज झाला आहे, तो यूट्यूबला मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतोय. कन्नड 'सैराट' अर्थात 'मनसू मल्लीगे'चा प्रोमो आहे.

Feb 27, 2017, 08:31 PM IST

व्हिडिओ : आर्ची पुन्हा एकदा... पण, कन्नडमध्ये!

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि रिंकु राजगुरुची प्रमुख भूमिका असलेला सैराट या गाजलेल्या सिनेमाचा कन्नड रिमेक लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मनसू मलिगे असं या कन्नड सिनेमाचं नाव असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. 

Feb 25, 2017, 04:55 PM IST