sand mafia

सोलापुरात वाळू उपशावरून घमासान

सोलापुरात वाळू उपशावरून घमासान

Jan 23, 2015, 09:16 PM IST

'वाळू तस्करी थांबवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं'

वाळू तस्करी रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेच असल्याचं मत राष्ट्रवादीच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

Oct 3, 2014, 12:55 PM IST

अखेर दुर्गाशक्तींचं निलंबन मागे

उत्तर प्रदेशच्या आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांचं निलंबन अखेर उत्तर प्रदेश सरकारने मागे घेतलंय. निलंबनाचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने रद्द केलाय.

Sep 23, 2013, 12:09 AM IST

वाळू माफियांने केली सरपंचांची हत्या

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथील सरपंचावर वाळू माफियाने जेवणाचे निमंत्रण देऊन विषप्रयोग करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर मोहगाव येथे तणाव निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

Aug 24, 2013, 10:57 AM IST

वाळू माफियांवर कारवाई, महिला अधिकारीच निलंबित

वाळू माफियांविरुद्ध जोरदार कारवाई करत त्यांचे सर्व अवैध व्यवहार ठप्प केल्याने वाळू माफियांची मक्तेदारी संपुष्टात येत होती. मात्र, या वाळू माफियांना सरकारनेच अभय देण्याचा उद्योग सुरू ठेवल्याचे पुढे आलेय. वाळू माफियांविरुद्ध लढणाऱ्या आयएएस महिला अधिकारी यांना चक्क निलंबित करण्यात आले आहे.

Jul 29, 2013, 02:26 PM IST

माफियांचा धुमाकूळ, तहसीलदारांच्या पथकावर हल्ला

रायगड जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा धुमाकूळ सुरू केलाय. म्हसळा तालुक्यातल्या आंबेतमध्ये अवैध वाळू उपसा रोखणा-या तहसीलदारांच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय.

Feb 14, 2013, 01:07 PM IST

वाळूमाफियांचा तहसिलदारांवर हल्ला

राज्यात वाळूमाफियांचा हैदोस सुरुच आहे. वाळूमाफियांनी तहसिलदारांवर हल्ला केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. चिपळूणच्या तहसिलदार जयमाला मुरुडकर यांच्यावर वाळूमाफियांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. वाळूमाफियांविरोधात कारवाई करत असताना हा प्रकार घडला.

May 22, 2012, 01:57 PM IST

वाळू माफियांविरोधात नागरिक रस्त्यावर

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरखाली चिरडल्याने एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर डंपरचालक पसार झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं.

Apr 10, 2012, 05:24 PM IST

तहसीलदारावरील हल्ल्याचे राज्यभर पडसाद

रायगड जिल्ह्यात रोह्याच्या तहसीलदारांवर पिस्तुल रोखल्याचे पडसाद संपूर्ण कोकणात उमटू लागले आहेत. या घटनेमुळं ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Apr 3, 2012, 10:33 AM IST