राज ठाकरेंच्या अटकेचं राज्य सरकारसमोर आव्हान
राज्यात मनसेनं छेडलेल्या टोल आंदोलनप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज ठाकरेंवर हिंसेला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अटकेची शक्यता आहे.
Jan 29, 2014, 01:36 PM ISTपंढरपूरच्या बडव्यांना सुप्रीम कोर्टाचा चाप, मंदिर राज्यसरकारकडेच
पंढरपूरचं विठ्ठल मंदिर राज्यसरकारकडंच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. बडवे आणि उत्पातांची याचिका न्यायालयानं फेटाळलीय.
Jan 15, 2014, 02:24 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आघाडीचा घाईचा कारभार
लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना आता राज्य सरकारकडून सरकार काही महत्त्वाचे तसंच लोकप्रिय निर्णय झटपट घेण्याची शक्यता आहे. एकीकडे निर्णय होत नसल्याची ओरड सरकार मधले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री करत असताना आता सरकार गतीनं कामाला लागणार आहे. याची सुरूवातही झाली आहे.
Jan 9, 2014, 09:48 PM ISTकाँग्रेसला राष्ट्रवादीचा निर्वाणीचा इशारा...तर सरकारमधून बाहेर पडू
राज्य सरकारच्या संथ कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झालेत. आधी सुधारणा करा नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा गंभीर इशारा अजित पवार यांनी काँग्रेसला दिला आहे.
Jan 8, 2014, 07:45 PM IST‘महिला फ्लीट टॅक्सी`साठी परवाने मिळवणं झालं सोप्पं!
राज्य शासनानं आखलेल्या ‘महिला फ्लीट टॅक्सी’ योजनेची अंमलबजावणी लवकरच होण्याची चिन्हं आहेत. या योजनेसाठी महिलांना लिलाव पद्धतीनं परवाने देण्यात येणार आहेत. याविषयी निविदाही (टेन्डर) जारी करण्यात आलीय.
Jan 2, 2014, 08:27 AM IST‘भाजप’च्या ‘जादू’चा राज्य हिवाळी अधिवेशनावर परिणाम?
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरु होतंय. नेल्सन मंडेला यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला जाणार आहे.
Dec 9, 2013, 12:09 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांची महिन्याच्या शेवटीही दिवाळी!
यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असली तरी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र ऑक्टोबर महिन्यातच सुरू होणार आहे. कारण...
Oct 20, 2013, 03:47 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ!
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसात एक खुशखबर आहे. या कर्मचाऱ्यांना १० टक्के महागाई भत्ता देण्यास वित्त विभागानं मंजुरी दिलीय. यामुळं आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण भत्ता ९० टक्के होणार आहे.
Oct 9, 2013, 08:11 AM ISTएनएफडीसीने घेतली मराठी सिनेमाची दखल
मराठी चित्रपटाने आता यश मिळवत कोटीच्या घरात पदापर्ण केले आहे. ‘दुनियादारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा विक्रम केला आहे. आणि आता राष्ट्रीय चित्रपट महामंडळ दरवर्षी २ मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
Sep 5, 2013, 05:14 PM ISTराज ठाकरे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ‘एकमत’
राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांवरील टोलनाके टोल वसूली करीत आहेत. जर रस्ते खराब असतील तर टोल कशाला आकारता? हे थांबबा, अन्यथा सहनशक्ती संपेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने खराब रस्तावर बोट ठेवलेय. अशा रस्त्यांचा लोकांकडून टोल घेतला तर लोकांची सहनशक्ती संपते. त्यानंतर लोक कायदा हातात घेतात, असे मत न्यायालयाने नोंदवलेय.
Jun 29, 2013, 08:23 AM ISTव्यापाऱ्यांना लावणार एस्मा, सरकार आक्रमक
दुकाने बंद ठेवून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी राज्य सरकार आक्रमक झाले आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांवर आपले दुकान बंदचे आंदोलन मागे घ्यावे लागेल अन्य़था कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. एस्मा लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात.
May 14, 2013, 12:47 PM ISTकर्जमाफीचा घोटाळा
केंद्र सरकारच्या कर्जमाफी पाठोपाठ राज्य सरकारनंही आपली कर्जमाफी जाहीर केली होती.. आणि गंमत म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यानंतर आता राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा समोर आलाय..
Mar 18, 2013, 11:30 PM ISTराज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा!
केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचं झी 24 तासनं उघड केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात केवळ एका संस्थेत 52 लाखांच्या कर्जमाफीत तब्बल 42 लाख रुपये अपात्र लाभधारकांनी लाटल्याचं पुढं आलंय.
Mar 18, 2013, 06:13 PM ISTया पुढे फक्त `केजी स्कूल`ना परवानगी नाही
जागोजागी उभ्या राहात असलेल्या केजी स्कूलना आता आळा घालण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी यासंदर्भात नवी घोषणा केली. यापुढे सेल्फ पायनान्स स्कूल्सना केवळ केजी पुरता परवानगी मिळाणार नाही.
Dec 19, 2012, 04:21 PM IST'टोल'साठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा 'झोल'!
मनसेनं टोलनाक्यांवर कशा प्रकारे घोळ चालतो हे उघड केलंय, त्यामुळे आता टोलनाक्यांत काहीच झोल नाही हे सिद्ध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं कंबर कसली आहे. हा झोल लपवण्यासाठी त्यांनी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे.
Jul 27, 2012, 12:17 AM IST