stuck in the flood

अशी चूक करु नका; तुंगारेश्वर धबधब्यावर फिरायला गेलेले भलत्याच संकटात सापडले

  वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले पर्यटक भलत्याच संकटात सापडले आहेत. येथे फिरायला आलेल्या पर्यटकांच्या दोन कार नदीच्या प्रवाहात अडकल्याची घटना घडली. आज सकाळी हे पर्यटक पर्यटनासाठी तुंगारेश्वर धबब्यावर गेले होते. त्यांना स्थानिक नागरीकांनी विरोध केला मात्र त्यांना न जुमानता या गाडीचालकांनी कार नदीच्या प्रवाहात टाकली. पाण्याला जास्त वेग असल्याने या दोन्ही कार नदीतचं अडकून पडल्या. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून क्रेनच्या साहाय्याने या दोन्ही कार बाहेर काढल्या.

Jul 28, 2023, 06:45 PM IST
Badlapur How Did Rescue Operation Took Place From Mahalaxmi Express Train PT5M1S

बदलापूर । महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात, असे बाहेर काढले प्रवाशांना

२६ जुलैच्या पावसाने हजारभर प्रवाशांना अक्षरशः यातना सोसाव्या लागल्या. बदलापूरजवळच्या वांगणीमध्ये मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रुळावरून वाहणाऱ्या पुरामुळे अडकली आणि तब्बल १७ तास प्रवाशांनी जीव मुठीत धरून यातना सहन केल्या. या घटनेने प्रशासनाची उदासिनता आणि आपत्ती व्यवस्थापनाचा फोलपणा उघड झाला. या घटनेमध्ये रेल्वेच्या उदासिन कारभाराबरोबरच रेल्वे प्रशासनाची बेफिकीरी आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Jul 27, 2019, 11:45 PM IST

महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात, स्थानिक गावकरी बनले देवदूत

पुराच्या पाण्यात अडकलेली असताना स्थानिक गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनांच्या सहाय्याने बचावकार्य केले.  

Jul 27, 2019, 11:03 PM IST

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या ९ गरोदर महिलांची सुखरूप सुटका

 बदलापूर येथे पुराच्या पाण्यात पसलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांमध्ये ९ गरोदर महिला होत्या. 

Jul 27, 2019, 09:35 PM IST

१७ तासानंतर प्रवाशांची सुटका, प्रवाशांच्या जिवाशी रेल्वेचा खेळ

२६ जुलैच्या पावसाने हजारभर प्रवाशांना अक्षरशः यातना सोसाव्या लागल्या. बदलापूरजवळच्या वांगणीमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली.

Jul 27, 2019, 08:53 PM IST