शिवस्मारकाचा निधी, टोल भरपाईसाठी वापरा : राज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी देण्यात आलेला 100 कोटी रूपयांचा निधी टोलची भरपाई करण्यासाठी द्यावा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली.
Feb 13, 2014, 11:36 PM ISTशंभर टक्के टोलमुक्ती अशक्य – अजितदादा
आजच्या घडीला राज्यात शंभर टक्के टोलमुक्ती अशक्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.. काही लहान रस्ते आणि पूलांवरील टोल रद्द करण्याबाबत सकारात्मक असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.. राज ठाकरेंच्या टोलविरोधी आंदोलनावर उपमुख्यमंत्र्यांनी टीका केली..
Feb 13, 2014, 09:40 PM ISTटोल नाके बंद, मनसे इम्पॅक्ट नाही - भुजबळ
मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या बैठकीतल्या मागण्यांवर सरकारनं यापूर्वीच विचार केल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. नव्यानं लागू करण्यात येणा-या टोल धोरणात या सर्व बांबीचा समावेश करण्यात आलाय.
Feb 13, 2014, 09:25 PM ISTराज्यातील हे २५ टोलनाके बंद होणार
खासगीकरणांतर्गत दुपदरी करणाच्या प्रकल्पांची प्रादेशिक विभाग निहाय मार्गावरील राज्यातील आणि एमएसआरडीसीसह राष्ट्रीय महामार्गावरील (नॅशनल हायवे) एकूण २५ टोलनाके बंद होणार आहेत.
Feb 13, 2014, 01:28 PM ISTराज चर्चेचे फलित : राज्यातील २५ टोलनाके बंद होणार
राज्यातील ज्या मार्गावर रस्ते प्रकल्पांचा खर्च १० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. अशा रस्त्यांवर सुरू असलेले जवळपास २५ टोलनाके लवकरच बंद करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे.
Feb 13, 2014, 12:52 PM ISTजितेंद्र आव्हाडांनी काढली राज ठाकरेंची `अक्कल`
नक्कल करण्याची अक्कल नसल्यानं राज ठाकरेंच्या आजच्या टोलविरुद्धच्या आंदोलनाची फजिती झाली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. ते पुण्यात बोलत होते.
Feb 12, 2014, 10:57 PM ISTबंड्याचे `टोल मोल के बोल`
काय राव, आपण आज फूल टू नाराज झालोय, कारण आपल्या साहेबांचं आंदोलन पाच तास पण नाही चाललं.
Feb 12, 2014, 07:09 PM ISTआंदोलन फसलं... 'चर्चा' तर होणारच!
टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरू केलेलं रास्ता रोको आंदोलन अवघ्या ३६० मिनिटांत संपलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी चर्चेसाठी बोलावल्यानं, राज ठाकरेंनी ३६० अंशात यू टर्न घेत, आंदोलन मागे घेतलं. चर्चाच करायची होती, तर आजचं आंदोलन करून राज ठाकरेंनी काय साधलं? असा सवाल उपस्थित केला जातोय.
Feb 12, 2014, 06:31 PM ISTराज ठाकरे - मुख्यमंत्री चर्चा मीडियासमोर?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांनी अडिच तास ताब्य़ात घेतल्यानंतर सोडून देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय.
Feb 12, 2014, 05:18 PM ISTकाही पक्षांचे भान सुटत चालले- अजितदादांचा टोला
काही राजकीय पक्षांचे भान सुटत चालले आहे... निवडणुका जवळ आल्यामुळं जनतेच्या प्रश्नांची जाणिव झाली असावी असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंना मारला आहे...
Feb 12, 2014, 04:22 PM ISTआज, महाराष्ट्रभर हाय-वे बंद करणार
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे सांगितले.
Feb 11, 2014, 06:51 PM ISTमनसे कार्यकर्त्यांनी `टोलबंद`चा नारळ फोडला
उस्मानाबादेत कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा १२ तारखेआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. येणेगूर टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे.
Feb 10, 2014, 11:23 AM IST`टोल`ला `झेंडा` दाखवून मनसे कार्यकर्ते सभेला
पुण्यात थोड्याच वेळात एसपी कॉलेजच्या मैदानात राज ठाकरेंच्या सभेला सुरूवात होणार आहे. या सभेला कार्यकर्ते वाहनांवर बाहेरून आली आहेत.
Feb 9, 2014, 05:47 PM ISTटोल फोडचा मनसेला भरावा लागणार ‘मोल’
टोल वसुलीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये टोलनाक्यांवरील पावणेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी संबंधित मनसे कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Feb 7, 2014, 04:01 PM ISTकोल्हापुरात नगरसेवकांच्या अटकेनंतर तणाव
टोलवसुली विरोधात कोल्हापुरात पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कोल्हापुरात शिरोळ नाक्यावर आंदोलन करणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे.
Feb 5, 2014, 02:09 PM IST