मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा
केंद्र सरकारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
Mar 30, 2017, 08:30 PM ISTमुख्यमंत्री झाल्यानंतर योगी पहिल्यांदा गोरखपूरमध्ये जाणार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पहिल्यांदा त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. २६ मार्चला गोरखपूरमध्ये योगीराज बाबा गंभीरनाथ यांच्या पुण्यतिथीच्या समारोहात ते सहभागी होणार आहेत. गोरखनाथ मंदिरात सकाळी ११ वाजता हा समारोह सुरु होणार आहे.
Mar 25, 2017, 10:36 AM ISTपाहा मुलायम यांनी मोदींच्या कानात काय म्हटलं ?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथ ग्रहण समारोहात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सपाचे नेते मुलायम सिंह यादव यांची भेट झाली तेव्हा मुलायम सिंह यांनी मोदींच्या कानात काहीतरी म्हटलं. त्यानंतर यावर चर्चा रंगू लागल्या.
Mar 23, 2017, 01:43 PM ISTमुख्यमंत्री बनताच योगींनी घेतले ५ मोठे निर्णय
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यानंतर लोकांसमोर पक्षाचा आणि सरकारचा अजेंडा ठेवला आहे. कमीत कमी दिवसांमध्ये योगी सरकारने जे मोठे निर्णय घेतले आहेत त्यावरुन पुढे काय होणार याचे संकेत मिळू लागले आहेत.
Mar 23, 2017, 01:05 PM ISTमोदींच्या रस्त्यावर योगी, गोरखपूरमध्ये मिनी मुख्यमंत्री कार्यालय
यूपीचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रस्त्यावर चालतांना दिसत आहेत. एकीकडे ते सबका साथ सबका विकासची गोष्ट बोलत आहेत तर दुसरीकडे ते गोरखपूरमध्ये मिनी सीएमओ बनवण्याची तयारी करत आहेत. पण अजून अधिकृतरित्या याची घोषणा झालेली नाही.
Mar 20, 2017, 02:18 PM ISTमुख्यमंत्री बनताच योगींनी केल्या ५ मोठ्या घोषणा
उत्तर प्रदेशात भाजप सरकारकडून लोकांची अपेक्षा फार वाढली आहे. येत्या २ वर्षात योगी कसं काम करतात यावर २ वर्षात येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचं भवितव्य ठरणार आहे. निवडणुकीत भाजपने मतदारांना अनेक आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण होणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सरकार येताच पहिल्या २४ तासात कॅबिनेट बैठकीत हे शेतकरी कर्जमाफी आणि कत्तलखाने बंद करु असं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले होते. पण मुख्यमंत्री होताच योगींनी ५ मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Mar 20, 2017, 12:07 PM ISTउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ विराजमान
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह देखील उपस्थित होते.
Mar 19, 2017, 03:28 PM ISTयोगींना वडिलांनी दिला मोठा सल्ला, कुटुंब झालं भावूक
गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. योगी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. उत्तराखंडमध्ये राहणारे योगींचे पिता आनंद सिंह बिष्ट यांनी म्हटलं की, 'आज मी खूप आनंदात आहे. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. मुलगा त्याच्या इच्छेनुसारच काम करेल तर ते ठीक असतं.
Mar 19, 2017, 01:22 PM ISTयोगींची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर ओवैसींची प्रतिक्रिया
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसीने योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या न्यू इंडिया व्हिजनचा भाग आहे असं ओवैसींनी म्हटलं आहे.
Mar 19, 2017, 11:13 AM ISTयूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी
यूपीचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज अजय सिंह बिस्त उर्फ योगी आदित्यनाथ शपथ घेणार आहेत
Mar 19, 2017, 08:57 AM ISTउत्तरप्रदेशमध्ये भाजप साजरा करणार विजयोत्सव
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ४ राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता स्थापन केली आहे. पंजाबसोडून इतर ४ राज्यांमध्ये भाजप आपली सत्ता आणण्यात यशस्वी झाला. गोवा, मणिपूरमध्ये दुसऱ्या स्थानावर राहुनही भाजप सत्ता मिळवण्यात यशस्वी राहिला. यूपी आणि उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा अजून बाकी आहे.
Mar 16, 2017, 11:50 AM ISTकोण होणार उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2017, 03:20 PM ISTराजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री म्हणूनच कामकाज पाहणार
राजनाथ सिंह मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जाणार नाहीत. विश्वसनीय सूत्रांनी झी मीडियाला ही माहिती दिलीय. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान करायचं याची चाचपणी सध्या सुरु आहे.
Mar 13, 2017, 02:41 PM ISTसाक्षी महाराजांच्या वक्तव्याने युपीत भाजपचं टेन्शन वाढलं
उत्तर प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळतंय. भाजपने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अजून जाहीर केलेला नाही. पण आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपच्या विजयानंतर वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे खासदार साक्षी महाराज यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 11, 2017, 01:04 PM IST