नवी दिल्ली : केंद्र सरकारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
या श्रेणीची सुरक्षा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना देखील नव्हती. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना याआधी वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती.
'योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यानंतर केंद्रीय गुप्तचर विभागाने सुरक्षा संबंधात सरकारला अलर्ट केलं आहे. त्यानंतर योगींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.