uttarakhand

मोदींचा रामदेवबाबांना पाठिंबा, काँग्रेसवर टीका

`काँग्रेसचं सरकार योगगुरू रामदेव बाबांच्या मागं हात धुवून लागलं आहे. रोजच्या रोज त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत, असा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केलाय. शिवाय `रामदेवबाबांना अडकवण्यासाठी काँग्रेस जी ताकद लावतेय, ती ताकद त्यांनी उत्तराखंडातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी लावली असती तर त्यांचं भलं झालं असतं,` अशी तोफही मोदींनी डागली.

Dec 15, 2013, 04:39 PM IST

८६ दिवसांनंतर केदारनाथचे दरवाजे भक्तांसाठी खुले!

कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिरात आज ८६ दिवसांनंतर पूजा करण्यात आलीय. सकाळी ७ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर शुद्धिकरण पूजा करण्यात आली.

Sep 11, 2013, 09:45 AM IST

उत्तराखंड बेपत्तांचा मृत्यूचा दाखला दोन-तीन महिन्यात- शिंदे

उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलयात बेपत्ता असलेल्या लोकांच्या मृत्यूचा दाखला येत्या दोन-तीन महिन्यात देण्यात येऊल, असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय. बेपत्तांची वाट बघण्यात सात वर्ष थांबलं जाणार नाही, त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात येईल, असंही शिंदे म्हणाले.

Sep 5, 2013, 09:37 AM IST

उत्तराखंड : ५७४८ बेपत्ता लोकांना मृत घोषित करणार?

बचावकार्य पूर्ण झालं असलं तरीही अजूनही ५७४८ लोक बेपत्ता असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी दिलीय.

Jul 15, 2013, 02:10 PM IST

ही दोन झाडं आहेत पूर्वजन्मातील प्रियकर-प्रेयसी!

प्रेमाचं तेज अखंड तेवत राहतं असं म्हणतात. उत्तराखंडच्या मेलाघाट खातिमा नावाच्या एका छोट्या गावात हे प्रेमाचं तेज वर्षानुवर्ष फुलतंय.

Jul 3, 2013, 08:33 AM IST

संजूबाबा करणार उत्तराखंड पीडितांना मदत?

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सध्या पुण्याच्या येरवडा तुरुंगात असलेला कैदी आणि अभिनेता संजय दत्त हा सुद्धा उत्तराखंड पीडितांची दशा ऐकून हेलावून गेलाय

Jul 2, 2013, 11:44 AM IST

`उत्तराखंडच्या पीडितेशीच करायचंय लग्न`

या परिस्थितीत मात्र माणुसकीचा चेहरा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला. विविध राज्यातून मदतीचे हात आले. प्रत्येकानं आपाल्याला शक्य होईल तेवढी मदत करण्याची तयारीही दाखविली.

Jul 1, 2013, 12:52 PM IST

भाविकांना `वाचविण्यासाठी` नेत्यांनी केली हाणामारी!

आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार हणुमंतराव आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार रमेश राठोड हे विमानतळावरच एकमेकांना भिडले. अडकलेल्या भाविकांना परत कोण घेऊन जाणार? यावरून दोघांमध्ये वाद झाला.

Jun 27, 2013, 01:44 PM IST

उत्तराखंड : ध्येयवेड्या... `त्या` दोन जोड्या!

उत्तराखंडच्या आपत्तीमध्ये हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं इथं अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कर आणि हवाईदलाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता ‘फिल्ड’वर उतरलेत.

Jun 26, 2013, 02:37 PM IST

केदारनाथमध्ये प्रलयानंतर रोगराईच संकट

केदारनाथमध्ये प्रलयानंतर आता रोगराईच संकट उभ ठाकलय, त्यामुळे केदारनाथमध्ये जवळपास २५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. प्रत्येकाचे डीएनए राखून ठेवण्यात आलेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातले २३४ यात्रेकरू अद्याप बेपत्ता असल्याचं स्पष्ट झालंय.

Jun 26, 2013, 01:47 PM IST

आज पुन्हा टीहरीमध्ये ढगफूटी, तीन ठार!

उत्तराखंडवर पुन्हा एकदा निसर्गानं आपली अवकृपा दाखवून दिलीय. पुरात सगळंच उद्ध्वस्त झाल्यानंतर आज ‘टेहरी’च्या देवप्रयाग भागात आज सकाळी साडे सहाच्या सुमारास ढगफूटी झाली.

Jun 25, 2013, 05:10 PM IST

उत्तराखंड : ९,००० लोक अद्यापि बेपत्ता

उत्तराखंडामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. काल रात्रीपासून गुप्तकाशी परिसरात पाऊस सुरु आहे. या पावसानं बचाव कार्यासमोर आव्हान निर्माण केलंय. जवळपास ९,००० लोक अद्यापी बेपत्ता आहेत. आतापर्यंत ८२२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेय.

Jun 25, 2013, 05:03 PM IST

प्रेतांचे अवयव कापून दागिने केले लंपास!

साधूंच्या रूपातील काही बदमाषांनी पाण्यात तरंगणाऱ्या नोटांवर डल्ला मारला होता. तर काही लुटारूंनी दागिने लुटण्यासाठी क्रुरपणे भाविकांच्या प्रेतांचे अवयवही कापले.

Jun 25, 2013, 04:59 PM IST

उत्तराखंडमध्ये महाराष्ट्राचा कॅम्प सुरू….

उत्तराखंडच्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या भाविकांच्या मदतीसाठी आणि त्यांना सुरक्षित राज्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं गोचरला कॅम्प सुरु केलाय. तर आजपासून जोशीमठला कॅम्प सुरू होणार आहे.

Jun 25, 2013, 12:16 PM IST

अखेर राहुल गांधीही उत्तराखंड दौऱ्यावर!

उत्तराखंड प्रकरणावरुन झालेल्या टीकेमुळे राहुल गांधी आजपासून उत्तराखंड राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या देहराडूनमध्ये असलेल्या नियंत्रण कक्षालाही भेट देतील

Jun 24, 2013, 06:31 PM IST