विदर्भात ओला दुष्काळ, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
विदर्भातल्या अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर मदत जाहीर केलीय. अतिवृष्टीवरील चर्चेला उत्तर देताना मदत जाहीर केलीय. यंदा विदर्भात पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातलाय.
Aug 1, 2013, 05:53 PM ISTसचिन तेंडुलकर देणार विदर्भाला वीज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाच्या पीजवरून थेट राजकीय मैदानात उतरला. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कशाला राजकारणात जातोय, सचिन! अशा प्रतिक्रिया आल्यात. मात्र, सचिनने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काम करायचे ठरविले आहे. त्यासाठी सुरूवातीला ज्या गावात वीज नाही तेथे विजेची सुविधा देण्याचा संकल्प सोडला आहे.
Apr 24, 2013, 03:40 PM ISTविदर्भात थंडी, शेतकरी आनंदी
गेल्या काही दिवसांत विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत पारा दहा अंशाचा खाली घसरल्यानं ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. त्यामुळं थंडीतही शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आहे.
Dec 30, 2012, 09:18 PM ISTचंद्रपूर साहित्यनगरीत 'माय मराठी'चा जयघोष
डोईवर ग्रंथ घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील तरुणी, शिस्तबद्ध लेझीमपथक, मोरपंखांची टोपी घातलेला वासुदेव, अंगावर फटके मारणारा मरीआईचा भोप्या, अश्वारूढ मावळे, सजावट केलेले उंट, वाद्यवृंद पथकासह राष्ट्रसंतांच्या भजनांच्या सुरांनी नटलेल्या ग्रंथदिंडीने केलेल्या ‘माय मराठी'च्या जयघोषात अवघी चंद्रपूरनगरी दुमदुमून गेली. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभामंडपात न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
Feb 4, 2012, 09:04 AM IST