ख्रिस गेलचे वादळ, ठोकल्या २१५ रन्स
फोर, सिक्स लगावत वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल झिम्बाब्वे बॉलरसाठी कर्दनकाळ ठरला. गेलच्या वादळापुढे झिम्बाब्वे बॉलर सपशेल अपयशी ठरलेत. फोर आणि सिक्सची आतषबाजी करत ख्रिस गेलने शानदार द्विशतकी केले. वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी ३७३ रन्सचा डोंगर उभा केला.
Feb 24, 2015, 01:00 PM ISTस्कोअरकार्ड : वेस्टइंडिज आणि झिंम्बाब्वे (विश्वचषक)
वेस्टइंडिज आणि झिंम्बाब्वे यांच्यात आज लढत होत आहे.
Feb 24, 2015, 09:13 AM ISTवेस्टइंडिजने चारली पाकिस्तानला धूळ
भारताकडून सपाटून मार बसलेल्या पाकिस्तान संघाला पुन्हा एकदा दणका मिळाला आहे. आयर्लंडकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या वेस्ट इंडिजने शनिवारी पाकिस्तानला धूळ चारत १५० रन्सने दणदणीत विजय मिळविला.
Feb 21, 2015, 11:40 AM ISTस्कोअरकार्ड : वेस्ट इंडिज VS पाकिस्तान (दहावी वन-डे)
वेस्ट इंडिज VS पाकिस्तान (दहावी वन-डे) यांच्यात सामना सुरु आहे.
Feb 21, 2015, 06:58 AM ISTपहिल्याच शॉटवर सात रन्स आणि बनला नवा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकाविरोधात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या ओपनर क्रेग ब्रॅथवेटनं आपल्या पहिल्याच स्कोअरिंग शॉटवर इतिहास रचलाय. क्रेग टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिला असा खेळाडू बनलाय ज्यानं आपल्या रन्सची सुरुवात सात रन्सनी केलीय.
Jan 5, 2015, 10:21 PM ISTअर्धवट राहिलेली सीरिज भारतानं २-१नं जिंकली!
विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतानं शुक्रवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजचा ५९ धावांनी पराभव करीत मालिका २-१ नं जिंकली. पाहुण्या संघानं मालिकेतून माघार घेतल्यामुळं पाचवा सामना आता रद्द झाला आहे.
Oct 18, 2014, 07:49 AM IST२०५ वनडे मॅच खेळून धोनी आठव्या क्रमांकावर!
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे. हा रेकॉर्ड त्यानं वेस्टइंडीज विरूद्ध सामन्यात टॉस करण्यासाठी मैदानात उतरल्याक्षणीच केला आहे. धोनी हा त्याच्या कारकीर्दीतली २५०वी वनडे मॅच खेळणारा भारतातील आठव्या क्रमांकाचा खेळाडू झाला असून या ठिकाणी पोहचणारा जगातील चौथा क्रमांकाचा विकेटकीपर झाला आहे.
Oct 17, 2014, 06:19 PM ISTसीरिज अर्धवट सोडून वेस्ट इंडिज टीम मायदेशी परतणार
भारत वि. वेस्ट इंडिजचा एकदिवसीय सामना रद्द होणार आहे. क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये वेतनावरून वाद झाला असल्यानं हा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं दिलीय. याबाबतचं पत्रच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयला लिहिलंय.
Oct 17, 2014, 05:25 PM ISTवेस्टइंडिज विरुद्धच्या दोन वनडे भारतीय टीमची घोषणा
भारतीय क्रिकेट नियाम मंडळ (बीसीसीआय)ने वेस्ट इंडिज विरुद्धच्या शेवटच्या दोन वन डे आणि टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग आणि चॅम्पियन लीनमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या डावखुरा गोलंदाज अक्षर पटेलला टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.
Oct 14, 2014, 08:27 PM ISTदुसऱ्या वन-डेमध्ये टीम इंडियाला कमबॅकचं आव्हान
दुखापतग्रस्त मोहित शर्माऐवजी टीम इंडियामध्ये ईशांत शर्माला स्थान देण्यात आले आहे. पहिल्या वन-डेदरम्यान मोहितला दुखापत झाली आहे. आणि त्यामुळेच ईशांत शर्माला टीम इंडियात संधी देण्याचा निर्णय भारतीय सिलेक्शन कमिटीनं घेतला.
Oct 11, 2014, 11:04 AM ISTमोहितला डच्चू; इशांतला संधी!
मुंबई : वेस्ट इंडिजसोबत असलेल्या पाच दिवसीय वनडे सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय टीमचा गोलंदाज मोहित शर्मा याला डच्चू मिळालाय. त्याच्याऐवजी आता दिल्लीचा गोलंदाज इशांत शर्मा याला संधी मिळालीय.
Oct 10, 2014, 07:09 PM ISTविंडीजविरुद्ध सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज
विंडीजविरुद्ध सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आठ ऑक्टोबरपासून सुरु होणा-या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील तीन मॅचेससाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. इंग्लडविरोधात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली असल्याने वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.
Oct 6, 2014, 12:08 PM ISTअश्विनला विश्रांती, कुलदीप यादवची टीम इंडियामध्ये एंट्री
आठ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील तीन मॅचेससाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. आर. अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त रोहित शर्माऐवजी टीममध्ये अपेक्षेप्रमाणे मुरली विजयला स्थान देण्यात आलंय.
Oct 5, 2014, 08:40 AM ISTवेळापत्रक: भारत आणि वेस्टइंडिज क्रिकेट सीरिज
मुंबई : येत्या ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिज क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येतेय. या दरम्यान टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये पाच वनडे, तीन टेस्ट आणि एक टी-20 मॅच खेळल्या जाणार आहेत. या मॅचचं वेळापत्रक नुकतंच जाहीर झालंय.
Sep 15, 2014, 08:45 PM ISTवेस्टइंडीजनं बांग्लादेशला 10 विकेटनं हरवलं
मुशफिकुर रहीमच्या सेंच्युरीनंतरही वेस्टइंडिजनं पहिल्याच टेस्टच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी आज बांग्लादेशला लंचपूर्वीच 10 विकेटनं हरवलं.
Sep 10, 2014, 01:22 PM IST