world news

तब्बल २ किलोमीटर लांबीचा पिझ्झा

अमेरिकेतल्या लॉस अँजेलिसमध्ये एक पिझ्झा तयार करण्यात आला आहे. तब्बल दोन किलोमीटर लांबीचा हा पिझ्झा आहे. त्याची लांबी 6,333 फूट इतकी आहे. हा पिझ्झा जगातला सगळ्यात लांब पिझ्झा ठरला आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झाली आहे. याआधी सगळ्यात लांब पिझ्झा इटलीमध्ये तयार करण्यात आला होता. 6 हजार 82 फुटांचा हा पिझ्झा होता.

Jun 12, 2017, 01:17 PM IST

सर्वात वृद्ध महिलेची प्राणज्योत मावळली

जगातील सर्वात वृद्ध महिला एमा मोरॅनो यांचे वयाच्या ११७ व्या वर्षी निधन झाले. एमा मोरॅनो एकोणिसाव्या शतकात जन्माला आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १८९९ रोजी इटलीमधील वर्बानिया येथे झाला होता. एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या व्यक्तींमधील त्या एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी तीन शतके पाहिली.

Apr 16, 2017, 12:20 PM IST

शाळेतील विद्यार्थ्यांचं फेसबूकवर धक्कादायक कृत्य

 अमेरिकेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत शाळेत न जाता सेक्स केल्याचा व्हिडिओ फेसबूकवर टाकला आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्लासमेट्ससाठी फेसबूकच्या माध्यमातून लाईवस्ट्रीमिंग केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

May 15, 2016, 06:09 PM IST