zee24taas

एअरसेल संपूर्ण देशात ग्राहकांना देणार मोफत इंटरनेट सेवा

एअरसेलच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एअरसेलचे ग्राहक इंटरनेट सेवा मोफत मिळवू शकतात. कंपनीनं मोबाइल इंटरनेट वापरण्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही रणनिती वापरल्याचं कळतंय.

Oct 15, 2015, 06:42 PM IST

व्हिडिओ: पाहा PRDP गाण्यातील सलमान-सोनमची रोमँटिक केमेस्ट्री

पुढील महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर येतोय सलमान प्रेमच्या भूमिकेत पुन्हा आपल्या समोर... 'प्रेम रतन धन पायो'चं टायटल ट्रॅक रिलीज झालाय. या टायटल ट्रॅकमध्ये युवराज असलेला सलमान आणि प्रिसेंस सोनमची लव्हस्टोरी दिसतेय.

Oct 15, 2015, 06:11 PM IST

रेल्वेत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेल्वेचा अलर्ट

उत्तर प्रदेशात राजधानी एक्सप्रेसमध्ये दहशतवादी घुसण्याच्या अफवेनं गोंधळ झाल्यानंतर गुरूवारी रेल्वे महासंचालकांनी राज्यात दहशतवादी घटनांबद्दल अलर्ट जारी केलाय. या अंतर्गत रेल्वेच्या सर्व स्टेशन्सवर अलर्ट राहण्याचे आदेश दिले गेलेत.

Oct 15, 2015, 05:38 PM IST

द बिग बिलियन डेज: फ्लिपकार्टनं 10 तासांमध्ये विकले 5 लाख फोन

ई-वाणिज्य क्षेत्रातील प्रमुख कंपनी फ्लिपकार्टनं सांगितलं, त्यांनी सध्याच्या सेल (द बिग बिलियन डेज)मध्ये आज अवघ्या 10 तासांमध्ये पाच लाख मोबाईल हँडसेटची विक्री केलीय. फ्लिपकार्टनं सांगितलं की, हा एक प्रकारचा रेकॉर्ड आहे.. ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही मंचावर आतापर्यंत 10 तास इतक्या कमी वेळात भारतात 5 लाख मोबाईलची विक्री झालीय.

Oct 15, 2015, 05:09 PM IST

२३ जानेवारी २०१६ पासून नेताजींसंबंधीत फाईल्स सार्वजनिक करणार - पंतप्रधान

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडित फाईल्स पश्चिम बंगाल सरकारनं खुल्या केल्यानंतर केंद्र सरकारनंही त्यांच्याजवळील दस्ताऐवज खुले करावे अशी मागणी होती. आज याचसंदर्भात नेताजींच्या ३५ वंशजांनी मोदींच्या निवासस्थानी ७ आरसीआरवर त्यांची भेट घेतली. 

Oct 14, 2015, 09:37 PM IST

द. आफ्रिकेवर भारताचा २२ रन्सनं विजय, धोनीच्या ९२ रन्सला मिळालं यश

इंदूरचं होळकर स्टेडियम टीम इंडियासाठी पुन्हा लकी ठरलंय. भारतान दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी वनडे मॅच २२ रन्सनी जिंकली. आजच्या विजयानंतर वनडे सीरिजमध्ये भारतानं १-१ अशी बरोबरी साधलीय.

Oct 14, 2015, 09:19 PM IST

वजन कमी करण्यासाठी सोप्या आणि उपयुक्त टिप्स!

वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचं वजन वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळं आजारांचा विळखाही वाढतोय. मात्र घाबरण्याचं कारण नाही. आपण काही टिप्स फॉलो केल्या तर आपलं वजन कमी करू शकता. 

Oct 14, 2015, 08:40 PM IST

शिवसेना-भाजप वादावर पडदा? सेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शिवसेना-भाजपामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर शिवसेनेकडून एकप्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना-भाजपामधील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या ज्य़ेष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

Oct 14, 2015, 08:03 PM IST

राज्यात युती सरकार टिकेल, राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही - शरद पवार

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची स्वतःचीच भूमिका निश्चित नाही. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाही असा खुलासा, शरद पवार यांनी केला आहे. 

Oct 14, 2015, 07:50 PM IST

अवघ्या ७,९९९ रुपयांत घ्या २४ इंचचा LED TV

L!VE नं भारतात २४ इंच आणि ३२ इंचचे दोन बजेट एलईडी टिव्ही लॉन्च केले आहेत. याची किंमत क्रमश: ७,९९९ रुपये आणि ९,९९९ रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की, या रेंजमधील हे दोन मॉडल्समध्ये दुसऱ्या कंपनीच्या तुलनेत जास्त फीचर्स दिले गेलेत. 

Oct 14, 2015, 06:51 PM IST

लिव-इनमध्ये ठेवले संबंध, भांडणानंतर तरुणीनं केला बलात्काराचा आरोप

23 वर्षीय तरुणीसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणावर बलात्कार तसंच चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी देण्याच्या आरोपातून तरुणाची मुक्तता झालीय. तरुणीनं कोर्टात आपली चूक स्वीकारली की, तिनं भांडण झालं म्हणून रागाच्या भरात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली होती.

Oct 14, 2015, 05:56 PM IST

प्रभादेवीत साकारलंय तंजावरचं बृहदीश्वर मंदिर

प्रभादेवी इथल्या धनमिल नाक्याची महालक्ष्मी यंदा तंजावरच्या हजारो वर्षे पुरातन अशा बृहदीश्वर मंदिरात विराजमान झाली आहे. क्षणाक्षणाला बदलणारी मंदिराची रोषणाई पहिल्या दिवसांपासूनच देवीभक्तांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी ठरतेय. 

Oct 14, 2015, 05:02 PM IST

पाहा बिग बींची नात नव्या कशी करतेय आपल्या करिअरला सुरूवात

महानायक बॉलिवूडचा बादशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा पॅरिसमध्ये 28 नोव्हेंबरला होणाऱ्या फॅशन इव्हेंट 'Le Bal'मध्ये भाग घेतेय. पॅरिसमध्ये होणाऱ्या या इव्हेंटमध्ये अनेक देशांच्या सेलिब्रिटी फॅमिलीमधून तब्बल 25 मुली सहभाग घेणार आहेत.

Oct 14, 2015, 04:08 PM IST