शिवसेना-भाजप वादावर पडदा? सेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शिवसेना-भाजपामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर शिवसेनेकडून एकप्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना-भाजपामधील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या ज्य़ेष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

Updated: Oct 14, 2015, 10:23 PM IST
शिवसेना-भाजप वादावर पडदा? सेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: शिवसेना-भाजपामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर शिवसेनेकडून एकप्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना-भाजपामधील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या ज्य़ेष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

आणखी वाचा - राज्यात युती सरकार टिकेल, राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही - शरद पवार

या भेटीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी सरकारबद्दलची आणि भाजपाच्या काही नेत्यांच्या वागण्याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं शेवटच्या क्षणी निमंत्रण देण्यात आलं, त्यावरूनही शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय, असे प्रकार टाळण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समजतंय. 

आणखी वाचा - पंकूताईंच्या चिक्कीला क्लीन चीट, सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र

काही गोष्टींत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालण्याची मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सरकारकडून शिवसेनेला मिळत असलेल्या वागणुकीबाबतही यावेळी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली गेली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.