कर्जत

Mumbai Local : आता पनेवलहून थेट कर्जत गाठता येणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार! कसं ते जाणून घ्या…

Panvel Karjat Railway Line : पनवेल किंवा कर्जत या दोन्ही ठिकांनी जायचं म्हटलं की आधी किती वेळ जाईल? प्रवासात किती तास जातील? एवढ्या लांबचा प्रवास नकोच, असं म्हणत अनेकजण पनवेल किंवा कर्जतला जाण्यासाठी टाळटाळ करतात. पण आता याच प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता अवघ्या 30 मिनिटांत पनवेलहून थेट कर्जत गाठता येणार आहे.

Apr 4, 2024, 10:30 AM IST

CSMT ते Karjat चे अंतर होणार कमी; प्रवाशांचा अर्धा तास वाचणार! कसं ते जाणून घ्या…

Mumbai Local : सीएसएमटी- कर्जत प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता घरी आणखी लवकर पोहोचणं सहज शक्य. पाहा बातमी तुमच्या कामाची. 

 

Dec 4, 2023, 02:40 PM IST

साताऱ्यातील ठोसेघर धबधबा! महाराष्ट्रात आहे हा भारतातील दुसऱ्या क्रमाकांचा उंच धबधबा

साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. हा भारतातील सर्वाच उंच धबधबा आहे. 

Aug 16, 2023, 04:05 PM IST

महाराष्ट्रातील माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा; इथं गेल्यावर परत यावस वाटणार नाही

माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

Aug 15, 2023, 07:52 PM IST

Instagram Reels वर व्हायरल झालेला खोपोलीचा KP वॉटरफॉल; स्वत:च्या रिस्कवर जावं लागते

Instagram अनेक पोस्ट, रील्स  आणि फोटोस पाहून लोक  KP Falls धबधब्यावर जात आहे. येथून निसर्गाचे खूपच सुंदर दृष्य पहायला मिळते. 

 

Aug 8, 2023, 04:51 PM IST

शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?

नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र, सरकारच्या सुस्तावलेल्या सिस्टीमुळे ग्रामस्थांनी येथे पर्यटकांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.  सातपुडा देशाचे एक मोठे पर्यटन केंद्र बनू शकते. मात्र हक्काचे खावटी अनुदान ज्या आदिवासींना मिळत नाही त्यांना पर्यटनाचा निधी मिळाले याबाबत शंकाच आहे.

Aug 7, 2023, 11:37 PM IST

मुंबईच्या अगदी जवळ असलेले धबधबे, लोकल ट्रेनने तासाभरात पोहचता येईल

मुंबईच्या जवळ असलेले धबधबे. मुबई लोकल ट्रेन पकडून तुम्ही या धबधब्यांवर जाऊ असता. एका दिवसात तुम्ही येथे फिरुन रिटर्न देखील येऊ शकता. 

Jul 25, 2023, 07:55 PM IST

इरसालवाडी येथे भयानक स्थिती! दुर्गंधी आणि मृतदेहांचं विघटन सुरू झाल्यानं शोधकार्य थांबवले

इरसालवाडी दुर्घटनेतील शोधकार्य थांबवण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. अद्याप 57 जण बेपत्ता आहेत.

Jul 23, 2023, 09:53 PM IST

एक होतं इरसालवाडी... एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आणणारी भयानक दुर्घटना

कुणाचा मुलगा, मुलगी, कुणाची सून ,कुणाची आई, तर कुणाचं लेकरु ढिगा-याखाली गाडले  गेले. काळरात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात अनेकांचं जगणं संपलं आणि जे वाचले  त्यांच्या जगण्याचा अक्षरशः चिखल झाला आहे.  

Jul 20, 2023, 11:04 PM IST

इरसालवाडी ढिगाऱ्याखाली; बचावकार्य सुरु असतानाच अग्निशमन दलाच्या जवानावर ओढावला मृत्यू

रायगडः मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं राज्यातील बहुंताश भागात दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. बुधवारी रात्री रायगडमधील इरसालगड येथे असणाऱ्या इरसाल वाडी या अदिवासी वस्तीवर असणाऱ्या पाड्यावर दरड कोसळले. पूर्ण गाव झोपेत असतानाच गावावर दरड कोसळली. या घटनेत संपूर्ण गावच मलब्याखाली दबले गेले आहे. जवळपास 120पेक्षा अधिक लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्तापर्यंत पाच ते सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, २७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र हे बाचवकार्य सुरु असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानावर मृत्यू ओढावला आहे. 

Jul 20, 2023, 05:42 PM IST

फडणवीस-अजित पवारांच्या वाढदिवसाचं स्नेहभोजन रद्द; इरसालवाडीतील पीडितांना मदतीचं आवाहन

Fadnavis Ajit Pawar Birthday Dinner Party Cancelled: राज्याला पहिल्यांदाच 2 उपमुख्यमंत्री मिळाले असून या दोघांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने एक योगायोग जुळून आला आहे. या दोघांसाठीही एका विशेष पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी सर्व सत्ताधारी आमदारांना आमंत्रित करण्यात आलेलं.

Jul 20, 2023, 01:46 PM IST

...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! 12 दिवसांपूर्वी स्वर्गासारखं दिसायचं इरशालवाडी; पाहा Photos

Irshawadi Landslide Before And After Photos: रागयगडमधील इरसालगडाच्या पायथ्याशी असलेलं इरसालवाडी गावावर दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने संपूर्ण गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. या दुर्देवी घटनेनंतर इरसालवाडीचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडीओ समोर आला असून हे फोटो पाहून सोन्यासारख्या या गावाला कोणाची नजर लागली असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पाहूयात या गावाचे काही दिवसांपूर्वीचे फोटो...

Jul 20, 2023, 01:05 PM IST

Khalapur Irshalgad Landslide : दरड का कोसळते? जाणून घ्या यामागचं मुख्य कारण

Khalapur Irshalgad Landslide : कर्जतमध्ये असणाऱ्या इरसालगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरसालवाडी या लहानशा गावावर बुधवारी रात्री दरड कोसळली. आणि त्यामागचं कारण शोधण्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित झाले. 

 

Jul 20, 2023, 12:14 PM IST

दरड कोसळण्यापूर्वी इतकं सुंदर दिसायचं इरसालवाडी गाव; 12 दिवसांपूर्वीचा Drone Video पाहाच

Irshawadi Landslide Beautiful Drone Video: ज्या इरसालवाडीवर दरड कोसळली त्या इरसालवाडीचा 12 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून हे गाव किती सुंदर होतं याचा अंदाज लगेच बांधता येईल.

Jul 20, 2023, 12:05 PM IST

वडापाव तो बनता है भाऊ; पाहा बॉलिवूड अभिनेत्रीची खवैय्येगिरी

 काही ठिकाणं येतात जिथं वडापाव खाण्यासाठी खास गर्दी केली जाते

Nov 9, 2020, 10:36 AM IST