मुंबई : केरळच्या कोच्ची शहरात राहणारा निहाल हा दिवसाला १ लाख रूपये कमवतो, तुम्हाला धक्का बसला असेल, आणि याची देखील उत्कंठा लागली असेल हे कसे शक्य आहे, पण हे शक्य केलं आहे, निहाल आणि त्याच्या पालकांनी.
निहाल हा किचनमध्ये मदत करत होता, तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याचा तो सुंदर वाटणारा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि यूट्यूबला टाकला. हा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय झाला.
तेव्हा निहालने यूट्यूबवर कुकरी चॅनेल सुरू केलं, नवनवीन आणि कठीण वाटणाऱ्या रेसिपीसुद्धा निहाल सहज करत होता. त्याला गोडपदार्थ बनवायलाही आवडतं, त्याच्या यूट्यूब चॅनेलला प्रेक्षकवर्ग हा फार मोठा आहे.
यूट्यूबवर निहाल सारख्या मुलांना चांगला महसूल मिळत असला, तरी निहाल सारखं सर्वच यूट्यूबर करत नाहीत.
यूट्यबवर कॉपीराईटचे नियम अंत्यंत काटेकोर आहेत, जे दुसऱ्यांचे व्हिडीओ, संगीत फेरफार करून वापरतात, त्यांना यूट्यूब हजाराच्या वरही महसूल देत नाही. एवढंच नाही तर जे यूट्यूबवर अधिक आकर्षित करणारे व्हिडीओ तयार करतात, पण प्रत्यक्षात त्या व्हिडीओत तसे काही नसते, तसेच त्यात तथ्य नसेल, तर अशांनाही पैशांना मुकावं लागतं.