एअरटेल २५०० रुपयांत आणणार ४ जी फोन

रिलायन्स जिओच्या स्वस्त फोनला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनी सज्ज झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 10, 2017, 09:59 PM IST
एअरटेल २५०० रुपयांत आणणार ४ जी फोन title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या स्वस्त फोनला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनी सज्ज झाली आहे.

रिलायन्स जिओने १५०० रुपयांच्या डिपॉझिटवर ४जी फिचर फोन देण्याची घोषणा केली आणि सर्वांचेच धाबे दणाणले. त्यानंतर टेलिकॉम कंपन्यांसोबतच मोबाईल कंपन्यांनाही एक झटका बसला आहे. 

मात्र, आता रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेल कंपनी बाजारात आपला फोन आणणार आहे. एअरटेलने ४जी मोबाईल फोनची निर्मिती करण्याची तयारी सुरु केली आहे.

एअरटेलच्या या ४जी मोबाईल फोनची किंमत २५०० ते २७०० रुपयांपर्यंत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअरटेलचा हा फोन दिवाळीपूर्वी बाजारात लॉन्च होऊ शकतो. इतकेच नाहीतर या फोनसोबतच एअरटेल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध डेटा आणि वॉईस कॉल्स लॉन्च करणार आहे.