मुंबई : अॅपलच्या आयफोन १० चं दमदार लॉन्चिंग झालं.
हा फोन अवघ्या काही वेळात आऊट ऑफ स्टॉक झाला. आयफोन दहा मध्ये फेस आयडी टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये तुमचा चेहरा पाहून फोन अनलॉक करण्याची सोय आहे.
आयफोन दहा जसा सोयी सुविधांनी सज्ज आहे. तसा तो पडल्यास आणि स्क्रीन तुटल्यास तुम्हंला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तुटलेल्या फोनची दुरूस्ती करण्यासाठी सुमारे ४१,६०० इतका खर्च येऊ शकतो. म्हणजेच इतक्या रूपयांमध्ये नवा आयफोन 7 विकत घेतला जाऊ शकतो.
सध्या आयफोन दहाची किंमत सुमारे ८९,००० इतकी आहे. स्क्रिन तुटल्यास त्याच्या दुरूस्तीसह खर्च सुमारे एक लाखाहूनही अधिक होऊ शकतो. एका अहवालाने दिलेल्या माहितीनुसार आयफोन दहाच्या दुरूस्तीचा खर्च किमान 35,000 रूपये होतो. त्यामुळे विकत घ्यायला हा फोन जितका महाग आहे तितकाच तो दुरूस्तीसाठीदेखिल महागडा आहे.