मुंबई : आधारकार्ड हे पॅनकार्ड, एलआयसी पॉलिसी, बॅंकेची अकाऊंट्स सोबतच मोबाईल सीमसोबत लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेळीच ही लिंकिंग प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित सेवा खंडित केली जाणार आहे. पण सध्या या सार्याप्रमाणेच फेसबुकवरही आधारकार्डाची गरज लागत आहे.
मोबाईलवरून नव्याने फेसबुक अकाऊंट बनवत असाल तर तुम्हांला आधारकार्डाची गरज भासू शकते. कारण तुमचे नाव आधारकार्डाप्रमाणेच भरा असा संदेश फेसबुककडून दिला जातो. पण तुमच्यासाठी दिलासादायक बातमी ही आहे की, फेसबुकवर आधारकार्डाप्रमाणेच नाव लिहणं हे अनिवार्य नाही. हे केवळ वैकल्पिक आहे.
Just what you need @facebook wants you to enter your name as exactly in your #Aadhaar card.https://t.co/qkOCfYf6eE pic.twitter.com/9nrszl5rsb
— Srinivas Kodali | శ్రీనివాస్ కొడాలి (@digitaldutta) December 26, 2017
फेसबुकवर अकाऊंट बनवताना आधारकार्डाप्रमाणेच नाव लिहल्यास फेक अकाऊंट्सवर आळा घालता येईल. तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना सोधल मीडियावर तुम्हांला शोधणं सुकर होणार आहे.
फेसबुकवर आधारकार्ड लिंक करण्याची गरज नाही. तसेच नावदेखील आधारकार्डाप्रमाणे लिहायलाच हवे असे नाही. परंतू फेसबुकवर हा पर्याय केवळ टेस्टिंगच्या स्वरूपात दिला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय अजूनही घेण्यात आलेला नाही.