close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फेसबुककडून पहिला अधिकृत गेम लॉन्च, दिवसाला ३ लाख जिंकण्याची संधी

फेसबुकने लॉन्च केला पहिला अधिकृत गेम

Updated: Jun 12, 2019, 12:50 PM IST
फेसबुककडून पहिला अधिकृत गेम लॉन्च, दिवसाला ३ लाख जिंकण्याची संधी

मुंबई : फेसबुकवर दिवसाला तीन लाख रूपये जिंकण्याची संधी आता भारतातल्या युजर्सनाही मिळणार आहे. फेसबुकने कॉन्फेटी हा इंटरॅक्टीव्ह गेम भारतात आणण्याचं ठरवलं आहे. आज हा खेळ प्रदर्षित होईल आणि बुधवार ते रविवार फेसबुकच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर हा खेळ लाईव्ह खेळला जाईल. यात स्पर्धकांना विविध प्रश्न विचारले जातील. त्यातल्या विजेत्यांना ३ लाखांचं बक्षीस जिंकण्याची संधी असेल. 

हा शो प्रथम अमेरिकेत प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याचा प्रसार युके, कॅनडा, मेक्सिको, थायलंड, व्हीएटनाम आणि फिलीपाईन्स या देशातही झाला. कॉन्फेटी हा जागतिक स्तरावरचा खेळ असेल मात्र खेळाचा अनुभव हा संपूर्णतः भारतीय असेल असा प्रयत्न फेसबुकने केल्याचं फेसबुक इंडियाने म्हटलं आहे. 

फेसबुकचे अधिकारी मनीष चोपडा यांनी म्हटलं की, 'हा भारतातील आमचा पहिला ऑफिशियल शो आहे. आम्ही हे पाहण्यासाठी उत्सुक आहोत की, युजर्सला आणखी चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी आणि ग्रुप्सला फेसबुकवर वेगळ्या आणि इंटरॅक्टिव्ह व्हिडिओचा अनुभव देण्यासाठी हा सक्षम काम करेल.' मुंबईमध्ये याची घोषणा केली गेली.