Viral : तुमच्या मोबाईलमधील (Mobile) सिम कार्ड (Sim Card) 24 तास बंद राहणार असल्याचा दावा करण्यात आलाय. केंद्र सरकारने (Central Government) नवा नियम केल्यामुळे सिम बंद ठेवलं जाणार असल्याचा हा दावा आहे. मात्र खरच सिम कार्ड 24 तास बंद ठेवलं जाणार आहे का? याची आम्ही पोलखोल (Fact Check) केली. मग काय सत्य समोर आल चला पाहुयात. (fact check viral polkhol sim card system closed for 24 hours know what true)
दावा आहे की, 24 तास मोबाईल सेवा बंद राहणार, मोबाईलमधील सिम कार्ड काम करणार नाही. हा दावा सोशल मीडियावर करण्यात आल्यानं अनेकामध्ये संभ्रम निर्माण झालाय. मोबाईल हा आपल्या जगण्याचा भाग बनलाय. त्यामुळे 24 तासांसाठी मोबाईल सेवा बंद झाली तर कामं होणार कशी? एकमेकाशी संवाद साधायचा कसा? व्हॉट्सअप चॅटिंगच काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात.
केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार 24 तासांसाठी सिम कार्ड बंद राहणार आहेत. यामुळे कुणाशीही संपर्क होऊ शकणार नाही. हा मेसेज व्हायरल झाल्यानं याची आम्ही पडताळणी सुरू केली. खरंच केंद्र सरकारने असा कोणता नवा नियम बनवलाय का? याची आम्ही माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहूयात.
व्हायरल होत असलेला मेसेज दिशाभूल करणारा आहे. सिम कार्ड 24 तासांसाठी बंद होणार नाही. नवीन सिम कार्ड किंवा सिम स्वॅप केल्यास SMS सेवा 24 तास बंद राहते. केंद्र सरकारने मोबाईल सेवा बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. लोकाची दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जातात. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरला. अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका.