Viral Polkhol : बातमी आहे एका व्हायरल दाव्याची. तुम्ही वापरत असलेलं व्हॉट्सअॅप (Whatsapp) आता रात्री बंद होणार आहे. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. पण, होय एक मेसेज व्हायरल होतोय. यात तसा दावा करण्यात आलाय. खरंच रात्री व्हॉट्सअॅप सेवा बंद राहणार आहे का? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol whatsApp service will be closed at night know what true what false)
व्हॉट्सअॅप आता लोकांची गरज बनलंय. व्हॉट्सअॅपशिवाय अनेकांना झोपही येत नाही. पण, रात्री 11.30 ते सकाळी 6 पर्यंत व्हॉट्सअॅप बंद राहणार असा दावा केल्यानं व्हॉट्सअॅप प्रेमींची झोपच उडालीय. केंद्र सरकारच्या नावाने मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांचा यावर विश्वास आहे. पण, खरंच रात्री साडे अकरानंतर व्हॉट्सअॅप बंद होणार का? आणि ते कधीपासून होणार आहे? याची पडताळणी आमच्या व्हायरल पोलखोल टीमनं सुरू केली.पण, मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहुयात.
रात्री 11.30 ते सकाळी 6 पर्यंत व्हॉट्सअॅप बंद होणार. मेसेज फॉरवर्ड केला नाही तर तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट बंद होईल. बंद झालेलं अकाऊंट पुन्हा चालू करण्यासाठी 499 रुपयांचा दंड आकारला जाईल. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्यावेळी आम्हाला पीआयबीच्या ट्विटर हॅन्डलवर अधिक माहिती मिळाली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात.
रात्री 11.30 नंतर व्हॉट्सअॅप बंद होणार नाही. केंद्राच्या नावाने व्हायरल होत असलेला मेसेज खोटा. सोशल मीडियावर दिशाभूल करणारा मेसेज व्हायरल. केंद्र सरकारने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. सोशल मीडियावर असे मेसेज व्हायरल करून व्हॉट्सअॅप यूजरची दिशाभूल केली जातेय. त्यामुळे आमच्या पडताळणी रात्री व्हॉट्सअॅप बंद राहणार असल्याचा दावा असत्य ठरला.