Fan Speed And Electricity: उन्हाळ्यामध्ये वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे वीजेचं बिलही अधिक येतं. लाईट बिलचा विचार करुन उन्हाळ्यामध्ये घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणंही लोक जपून वापरतात. लाईट बिल कमी यावं किंवा नियंत्रणात रहावं असा प्रयत्न सर्वांच्याच घरी केला जातो. अनेक जण कमी वीज वापरण्याच्या उद्देशाने एसी सुद्धा कमी तापमनावर चालवत नाहीत. अनेक घरांमध्ये असाच प्रकार पंख्याबद्दलही दिसून येतो. म्हणजे फॅनचा रेग्युलेटर कमीत कमी संख्येवर ठेवल्यास वीज वाचते असा अनेकांचा समज असतो. उदाहरण घ्यायचं झालं वेगाच्याबाबतीत 1 वर ठेवलेला पंखा हा 5 वर ठेवलेल्या पंख्यापेक्षा कमी वीज वापरतो असा एक समज आहे.
अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की पंखा वेगवेगळ्या वेगात फिरला आणि रेग्युलेटर कमी क्रमांकावर टेवल्यास त्याचा वीजेच्या वापरावर काही फरक पडतो का? दर उन्हाळ्यात वाढीव वीज बिलांमुळे चर्चेत असणारा हा पंख्यांच्या वेगाचं आणि वीज वापराचं काही कनेक्शन खरोखर असतं का हे आपण जाणून घेणार आहोत.
थेट सांगायचं झाल्यास पंख्यासाठी वापरली जाणारी वीज आणि त्याचा वेग यांचा संबंध असतो. मात्र हा वीजवापर मोठ्याप्रमाणात रेग्युलेटवरही अवलंबून असतो. पंख्याचा वेग कंट्रोल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेग्युलेटरवर वीजेचा वापर कमी होतो की अधिक हे निर्भर असतं. मात्र सध्या अनेक असेल रेल्युलेटर बाजारामध्ये उपलब्ध आहेत ज्यांचा वीजेच्या वापराशी काहीही थेट संबंध नसतो. हे रेग्युलेटर एका नियंत्रित विद्युतप्रवाहामध्येच पंख्याचा वेग नियंत्रित करतात.
रेग्युलेटरच्या प्रकार पंख्याचा वेग हा वीजेच्या वापराशी संबंधित आहे की नाही हे ठरवतो. म्हणजेच रेग्युलेटर कोणता आहे यावर वीजेची बचत होणार की अधिक वेगाने फिरण्यासाठी पंख्याला अधिक वीज लागणार हे ठरवतो. अनेक रेग्युलेटर हे फॅनसाठी वापरल्या जाणाऱ्या वीज प्रवाहाचा व्होल्टेज कमी करुन पंख्याचा वेग नियंत्रित करतात.
हे रेग्युलेटर पंख्याला पुरवठा होणाऱ्या वीजेचा व्होल्टेज कमी करुन वेग नियंत्रणात ठेवतात. यामुळे पंख्यासाठी कमी वीज लागते. मात्र अनेकदा यामुळे वीजेची बचत होत नाही कारण अशा परिस्थितीत रेग्युलेटर रेझिस्टरसारखा काम करतो. त्यामुळेच पंख्याचा वेग कमी करुन वीजेचा वापर कमी करता येत नाही.
ही सिस्टीम जुन्या रेग्युलेटर्समध्ये होती जे आकाराने थोडे मोठे असायचे. मात्र आता नवीन तंत्रज्ञानामुसार रेग्युलेटर्समध्येही मोठा बदल झाला आहे. नवे रेग्युलेटर्स हे वेगवगेळ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर काम करतात ज्यामुळे वीजेची बचत होते.
सध्या इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर मोठ्या प्रमाणात वापरले जातात. हे पारंपारिक रेग्युलेटरपेक्षा अधिक प्रभावी असतात असं सांगितलं जातं. या नव्या रेग्युलेटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजबचत शक्य होते. या नव्या रेल्युलेटरमध्ये सर्वाधिक वेगात पंखा असताना वापरली जाणारी वीज आणि कमी वेगात पंखा असताना वापरली जाणारी वीज ही वेगवेगळ्या प्रमाणात असते.