मुंबई : भारतामध्ये सणांचा मोसम सुरू झाला आहे. नवरात्रापासून ते दिवाळीपर्यंत भारतीय नागरिक नवीन गोष्टी विकत घेण्यासाठी आग्रही असतात. या कालावधीमध्ये कंपन्याही अनेक आकर्षक ऑफर घेऊन येतात. कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीदेखील अशाच ऑफर घेऊन आली आहे. मारुती सुझुकीच्या वॅगन आर या गाडीवर सर्वाधिक डिस्काऊंट देण्यात येतोय. वॅगन आर वर सर्वाधिक जास्तीत जास्त 1 लाख रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळणार आहे. तर बलेनो गाडीवर सगळ्यात कमी 10 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळेल. वॅगन आरवर मिळणारा एकूण डिस्काऊंट 1.85 लाख रुपयांपर्यंत आहे. यातले 85 हजार रुपये एक्सचेंज बोनसच्या रुपात मिळतील. कॉरपोरेट्सना मारुती डिलर्स 15 हजार रुपयांचा जास्तीचा डिस्काऊंट देत आहेत.
मारुती सुझुकी ऑल्टो 800 वर 40 हजार रुपये कॅश डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनस म्हणून 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. ऑल्टो के10 वर 50 हजारांचा कॅश डिस्काऊंट आणि 65 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल.
सेलेरियोवर 95 हजारांचा कॅश डिस्काऊंट आणि 40 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस असेल. मारुती डिझायर गाडीवर 40 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 50 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे. बलेनो गाडीवर 10 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 15 हजार रुपयांचा कॉरपोरेट डिस्काऊंट आहे. मारुती स्विफ्टवर 30 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 35 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे.