फ्लिपकार्टवर रेडमी नोट ६ प्रो स्मार्टफोनवर १३ हजारांची सूट

 इतर वस्तूंवरदेखील ऑफर देण्यात आली आहे

Updated: Dec 28, 2018, 02:37 PM IST
फ्लिपकार्टवर रेडमी नोट ६ प्रो स्मार्टफोनवर १३ हजारांची सूट title=

नवी दिल्ली: फ्लिपकार्टवर सुरु झालेल्या सेलचा आज तिसरा दिवस आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनसह इतर वस्तूंवरदेखील कॅशबॅक आणि एक्स्चेंजसारखी सवलत मिळणार आहे. परंतु, रेडमी ६ प्रो स्मार्टफोनवर आकर्षक अशी सूट देण्यात आली आहे. सेलच्या तिसऱ्या दिवशी प्लिपकार्टने शिओमीचे रेडमी ६ प्रो स्मार्टफोनवर १३ हजार ८०० रुपयांची मोठी सूट दिली आहे. त्यासोबत इतर वस्तूंवरदेखील ऑफर देण्यात आली आहे. बाजारात रेडमी ६ प्रो स्मार्टफोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे.

कसा मिळवणार फायदा

फ्लिपकार्टवर शिओमीचा स्मार्टफोन रेडमी ६ प्रोवर १३ हजार ८०० रुपयांची सूट मिळणार आहे. जुना स्मार्टफोन एक्स्चेंज केल्यास १३ हजार ८०० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. अॅक्सिस बॅंकेच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे दिले तर तुम्हाला ५ टक्के सवलत मिळणार आहे. तसेच एसबीआयच्या क्रेडिट कार्डने पैसे दिल्यास १० टक्के सवलत मिळणार आहे. याशिवाय फोनवर ७ हजार रुपयांचे बायबॅक मूल्य ऑफर देखील दिला जात आहे.

स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये

रेडमी नोट ६ प्रो स्मार्टफोनचा डिस्प्ले ६.२६ इंच आहे. डिस्प्लेच्या सुरक्षिततेसाठी गोरिला ग्लास लावण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ४ जीबी ६ जीबी रॅमसह ६४ जीबी स्टोअरेजमध्ये उपलब्ध आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनची मेमरी १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा १२ मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा ५ मेगापिक्सल देण्यात आले आहे. यात ४००० एमएएचची बॅटरी आहे.