फुकटात मिळतोय iPhone 12! जाणून घ्या ऑफर काय?

तुम्ही जर आयफोन (iPhone) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. 

Updated: Sep 6, 2022, 12:09 AM IST
फुकटात मिळतोय iPhone 12! जाणून घ्या ऑफर काय? title=

पोपट पिटेकर, झी मीडिया,मुंबई : तुम्ही जर आयफोन (iPhone) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही सहज iPhone 12 फुकटात मिळवू शकता, होय हे खरं आहे. आयफोन 12 कसा मिळवायचा  हे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. (get free iPhone 12 know just do this thing follow step in marathi)

सर्वात प्रीमियम आणि महाग फोनमध्ये आयफोन येतात. पण आता आयफोन घेणाऱ्यांसाठी एक ऑफर आली आहे. याद्वारे iPhone 12 फुकटात मिळणार आहे. मात्र यात एक अट आहे.  Verizon ने iPhone 12 मोफत मिळवणं खरोखरच शक्य केलयं. हा iPhone दोन वर्षांपूर्वी 64GB च्या बेस मॉडेलसाठी $699 (रु. 55,840) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता.

पण व्हेरिझॉनच्या डीलमुळे फोन अगदी मोफत झाला आहे. हा आयफोन मिळवण्यासाठी कोणत्याही मागणीच्या ट्रेड- इनमधून जाण्याची अजिबात गरज नाही. आयफोन 12 हा मोफत मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त Verizon वरून एक नवीन लाइन खरेदी करायची आहे.

आयफोन 12 A14 हा बायोनिक चिपसेटसह सज्ज असं आहे. त्याची कॅमेरा क्लियारिटी उत्तम स्वरुपाची आहे. त्याचबरोबर iOS 16 चं नवीन अपग्रेड देखील मिळेल. हे अपग्रेड 7 सप्टेंबरला रिलीज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आयफोन 12 ला आणखी चांगलं बनवतं. पण आयफोन तुमचा होण्यापूर्वी तुम्हाला या नियम आणि अटीच पालन करावं लागणार आहे.

व्हेरिझॉन वर आयफोन12 मिळणार

आयफोन 12 मिळवण्यासाठी खालील अटी फॉलो करा. 

स्टेप 1: व्हेरिझॉन वेबसाइटवर जाऊन iPhone 12 शोधा.

स्टेप 2 : आयफोन 12 शोधल्यानंतर आता तुमच्या आवडीनुसार आयफोन 12 साठी मेमरी आणि कलर निवडा.

स्टेप 3 :  त्यानंतर नवीन लाइनचा पर्याय जोडा आणि निवडक 5G अमर्यादित प्लॅनसह ते विनामूल्य ऑप्शन निवडा. नंतर नवीन ओळ असलेल्या आवश्यक वर टॅप करा.

स्टेप 4: ही सर्व प्रोसेस सुरू ठेवा आणि वरील बाजूला क्लिक करा. त्यानंतर पुढील विंडोमध्ये नवीन यूजर ऑप्शन निवडा.

स्टेप 5 :  वरील सर्व प्रोसेस झाल्यानंतर तिथे एक नवीन स्क्रीन उघडेल.  इथे तुम्हाला तुमचा पिन कोड आणि पत्ता टाकायचाय.

स्टेप 6 : येथे तुम्हाला अनेक Verizon असलेले प्लान्स पाहायला मिळतील. पण तुम्हाला जो प्लान पाहिजे तो  निवडा. आयफोन12 मोफत मिळवण्यासाठी 36 महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे जा.

स्टेप 7 : एकदा पेमेंट पूर्ण झाल्यावर Verizon सदस्यत्व योजनेसह आयफोन12 तुमचा असेल. अशा पध्दतीने तुम्ही जर सर्व प्रोसेस व्यवस्थित पुर्ण केली तर आयफोन तुमचाच.