खुशखबर... खुशखबर... CNG कारच्या दुनियेत केली 'या' कारने एन्ट्री... जाणून घ्या

Hyundai Grand i10 Nios Asta CNG : दक्षिण कोरियन ऑटोमेकर असणाऱ्या Hyundai कंपनीने नवीन Grand i10 Nios Asta CNG  लाँच केली आहे, ज्याची किंमत 8.45 लाख रुपये आहे.

Updated: Jul 22, 2022, 05:45 PM IST
खुशखबर... खुशखबर... CNG कारच्या दुनियेत केली 'या' कारने एन्ट्री... जाणून घ्या title=

Hyundai Grand i10 Nios Asta CNG Pirce & Spscifications : दक्षिण कोरियन ऑटोमेकर असणाऱ्या Hyundai कंपनीने नवीन Grand i10 Nios Asta CNG  लॉन्च केली आहे, ज्याची किंमत 8.45 लाख रुपये आहे.  हे पेट्रोल मॅन्युअल Grand i10 Nios Asta पेक्षा जवळपास 92,000 रुपये महाग आहे. यापुर्वी याकंपनीने  Magna आणि Sportz CNG लाँच केल्या आहेत, ज्यांची किंमत 7.16 लाख आणि 7.70 लाख रुपये इतकी आहे. हे दोन्ही मॉडेल्स त्यांच्या पेट्रोल व्हर्जनपेक्षा सुमारे 1 लाख रुपयांनी महाग आहेत. या सर्व किंमती एक्स-शोरूम, दिल्लीतल्या आहेत. याआधीच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन Hyundai Grand i10 Nios Asta CNG मॉडेलमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

पेट्रोल व्हेरियंटप्रमाणेच, या मॉडेलमध्ये अ‍ॅडजस्टेबल रीअर हेडरेस्ट, पुश बटण स्टार्ट/स्टॉप सिस्टम, मागील वायपर/वॉशर, लगेज लॅम्प, मागील क्रोम गार्निश, दरवाजाच्या हँडलच्या बाहेर क्रोम आणि पार्किंग लीव्हरच्या टोकावर क्रोम फिनिश या सुविधा मिळणार आहेत. यात अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले आणि व्हॉइस रेकग्निशनसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 5.3-इंच सेमी-डिजिटल मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील, आर्कॅमीस प्रीमियम साउंड सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग आणि कूल्ड ग्लोव्ह बॉक्स देखील असणार आहे.

पॉवरसाठी  Hyundai Grand i10 Asta CNG या मॉडेलमध्ये 1.2-लीटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरेलेलं आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. हे इंजिन 68bhp कमाल पॉवर आणि 95.2Nm पीक टॉर्क जनरेट करू शकतं. त्याचबरोबर, पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत CNG प्रकारातील पॉवर आणि टॉर्कचे आकडे हे 14bhp आणि 19Nm ने कमी आहेत. असं असलं तरी ते पेट्रोल मॉडेलपेक्षा जास्त मायलेज देईल.

'या' आहेत भारतातील सर्वाधिक मायलेज असलेल्या CNG कार्स

भारतातील सर्वाधिक मायलेज असलेल्या 5 सीएनजी कारपैकी 4 मारुती कंपनीच्या आहेत. यामध्ये Maruti Suzuki Celerio VXI CNG, Wagon R, Alto आणि S-Presso यांचा समावेश आहे. या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर Hyundai Santro ही CNG आहे, जी 30.48km मायलेज देऊ शकते.