इंस्टाग्राममध्ये येणार Live Room फिचर, जाणून घ्या

एपमध्ये लाईव्ह रुम (Live Room) फिचर अपडेट करण्यात आलंय

Updated: Dec 3, 2020, 03:57 PM IST
इंस्टाग्राममध्ये येणार Live Room फिचर, जाणून घ्या title=

नवी दिल्ली : सोशल मीडिया एप इंस्टाग्राम (Instagram) आता पहिल्यापेक्षा अधिक मजेशीर होणार आहे. एपमध्ये लाईव्ह रुम (Live Room) फिचर अपडेट करण्यात आलंय. आता इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडीओ बनवताना एकाहून अधिकजण सहभागी होऊ शकतात. 

इंस्टाग्रामने नुकतेच हे एप अपडेट केलंय. त्यामुळे एक नव्हे तर चार जणांसोबत तुम्ही एकावेळी लाईव्ह करु शकता. त्यामुळे तुमचं लाईव्ह रुम अधिक इफेक्टीव्ह दिसणार आहे. आता आपल्या अधिक फॉलोअर्सना तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये सहभागी करुन घेऊ शकता.

भारतात लवकरच अपडेट 

मिळालेलया माहितीनुसार, लाईव्ह रुम अपडेट अमेरीकेत आलंय. लवकरच ते भारतातील युजर्सना देखील वापरता येणार आहे. इंस्टाग्राम लाईव्ह, लोगोची सुविधा देखील यात असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात इंस्टाग्राम वापरण्याचा अनुभव अगदी सोपा होणार आहे. 

रील्स लॉंच करण्यापासून लाईव्ह रुम टेस्टिंग आणि रोलआऊट पर्यंत भारतातील युजर्सची भूमिका आमच्यासाठी महत्वाची असते. यामुळे भविष्यात उत्तम सेवा दिली जाऊ शकते असे फेसबुक इंडीयाचे संचालक अजित मोहन यांनी म्हटले. 

चीनी एप्स बंद केल्यानंतर इंस्टाग्रामवरील युजर्स मोठ्या प्रमाणात वाढले. यासाठी फेसबुकने देखील आपला प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम अधिक अपडेट ठेवलंय. मार्चमध्ये भारतात इंस्टाग्राम युजर्स ६० टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात येतंय.