आता इंस्टाग्राममध्ये होणार हे नवे बदल...

सोशल साईट्स वारंवार अपडेट होत असतात.

Updated: May 2, 2018, 01:14 PM IST
आता इंस्टाग्राममध्ये होणार हे नवे बदल... title=

मुंबई : सोशल मीडियाचा जमाना आहे. फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल साईट्सवर कोणाचे अकाऊंट नाही, असे खूप कमी लोक तुम्हाला सापडतील. या सोशल साईट्स वारंवार अपडेट होत असतात. आपल्यालाही त्यासोबत अपडेट व्हायचे असेल तर त्यातील बारकावे, नव्या येणारे अपडेट्स जाणून घेणे गरजेचे आहे. आता फेसबुकच्या अधिपत्यात असलेल्या इंस्टाग्राममध्ये येत्या काही दिवसात अनेक बदल दिसून येतील. सध्या इंस्टाग्रामवर फोटोज, व्हिडिओज आणि GIF चे कलेक्शन दिसून येते. पण याचे व्यवस्था काहीशी अव्यस्थ आहे. त्याचबरोबर तुमच्या वापरावर ते अवलंबून आहे.

म्हणून केले बदल...

या कलेक्शनला कोणताही योग्य पॅटन नाही. युजर्सच्या आवडीनिवडीचा विचार न करता इंस्टावर सर्व काही कसेही दिसते. म्हणजे फोटग्रापी, ट्रव्हल, सेलिब्रेटीज अशा काही ठराविक कॅटेगरीज नाही आहेत. म्हणून आता इंस्टा अधिक क्लीन आणि ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फेसबुकने ब्लॉगवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, आता इंस्टामध्ये नाविण्यपूर्ण बदल करण्यात येणार असून कॅटगरीनुसार पोस्ट दिसतील. आता पोस्ट करताना तुम्ही त्या कॅटगरीची निवड करु शकता. 

हे केले बदल...

  • त्यानंतरचा पर्याय असेल हॅशटॅग्स. त्याची तुम्ही कॅटगरीनुसार निवड करु शकता. 
  • हॅशटॅग नसलेलीही एक कॅटगरी असेल.
  • 'For You' हे एक नवे सेक्शन तिथे असेल. 
  • कॅटगरी सिलेक्ट करण्यासाठी युजर्सला उजवीकडील किंवा डावीकडील टॅब स्विप करावी लागेल. त्यावरील सर्व कॅटेगरी अतिशय ऑर्गनाईज असतील.
  • इंस्टा अत्यंत पर्सनलाईज, युजर फ्रेंडली करण्यासाठी फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.
  • हे फिचर्स लवकरच युजर्सच्या भेटीस येतील.