नवी दिल्ली : रिलायन्स जिओसोबत हातमिळवणी केल्यानंतर इंटेक्स टेक्नोलॉजीजने एक मोठी घोषणा केली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड इंटेक्स टेक्नोलॉजीजने आपल्या स्मार्टफोन युजर्ससाठी २५ जीबीचा अधिक डेटा देण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सर्व इंटेक्स ४जी स्मार्टफोन युजर्स जिओ कनेक्शनचा वापर करु शकतात. तसेच जिओ कनेक्शनचा वापर करुन प्रत्येक ४जी रिचार्जवर ५ जीबी अतिरिक्त डेटा त्यांना मिळणार आहे.
इंटेक्स टेक्नोलॉजी मोबाइल्सच्या संचालक निधी मार्कंडेय यांनी सांगितले की, रिलायन्स जिओ आणि पॅन-इंडिया मोबाइल डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क एकत्र येणं ही युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ही ऑफर जास्तीतजास्त पाच रिचार्जपर्यंत मर्यादित आहे.
स्मार्टफोन निर्माता इंटेक्स टेक्नोलॉजीजने मंगळवारी (२९ ऑगस्ट) रोजी आपला नवा स्मार्टफोन 'अॅक्वा स्टाइल 3' लॉन्च केला. या स्मार्टफोनची किंमत ४,२९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन ४जी-व्हिओएलटीई नेटवर्क सक्षम फोन आहे. या फोनचा डिस्प्ले ५ इंचाचा आहे. १ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी असून ही मेमरी ६४ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
इंटेक्सच्या उत्पादन प्रमुख इशिता बंसल यांनी सांगितले की, 'अॅक्वा स्टाइल 3' हा आम्ही नवा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन लेटेस्ट फीचर्सने समृद्ध आहे आणि त्याची डिझाईनही खास आहे.