JIO ग्राहकांना मोठा झटका, ३१ मार्च रोजी बंद होणार या सर्व फ्री सेवा!

तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 7, 2018, 04:18 PM IST
JIO ग्राहकांना मोठा झटका, ३१ मार्च रोजी बंद होणार या सर्व फ्री सेवा!

नवी दिल्ली : तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी एकीकडे नव-नवे प्लान्स लॉन्च करत आहे. तर, दुसरीकडे प्राईम युजर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण, ३१ मार्च २०१८ ला जिओची प्राईम मेंबरशिप संपत आहे.

२१ फेब्रवारी २०१७ रोजी मुकेश अंबानी यांनी जिओ प्राईम मेंबरशिप लॉन्च केली होती. ही मेंबरशिप घेण्याची शेवटची तारीख ३१ मार्च होती. त्यानंतर कंपनीने ही तारीख वाढवून १५ एप्रिल २०१७ केली होती. 

या प्राईम मेंबरशिपची वैधता १ वर्ष होती. जर तुम्ही १४ एप्रिल २०१७ रोजी मेंबरशिप घेतली असेल तर ३१ मार्च २०१८ रोजी तुमची मेंबरशिप संपेल.

फ्री अॅप्सही वापरता येणार नाहीत

जिओ प्राईम मेंबरशिपसोबत जिओ अॅप्स म्हणजेच जिओ टीव्ही, जिओ म्युझिक, जिओ सिनेमासारख्या १०,००० रुपयांचे अॅप्स ग्राहकांना फ्री मिळत होते. यासाठी ग्राहकांनी ९९ रुपये देत प्राईम मेंबरशिप घेतली होती. या मेंबरशिपसोबतच ग्राहकांना जिओचा एक बेस्ट प्लान खरेदी करावा लागला होता.

मेंबरशिपसंपल्यावर काय करावं? याबाबत अद्याप युजर्सला कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये. सूत्रांच्या मते, युजर्सला ही मेंबरशिप चालू ठेवण्यासाठी पुन्हा प्लान खरेदी करावा लागणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी जिओ प्राईम मेंबरशिपची रक्कम वाढवू शकते.

ही आहे प्राईम मेंबरशिपची अट

जिओ प्राईम मेंबरशिपची अट होती की, ३१ मार्च २०१८ रोजी संपणार आहे. आता युजर्सने जेव्हा कधीही मेंबरशिप घेतली असेल तरी ती ३१ मार्च रोजीच संपेल. कंपनी या मेंबरशिपची वैधता ३१ मार्चनंतर वाढवू शकते. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. तसेच नव्या प्लानच्या किंमतीतही वाढ होऊ शकते. असं झाल्यास युजर्सला जास्त पैसे खर्च करण्यास तयार रहावं लागेल.

जिओने कमी केली किंमत

रिलायन्स जिओने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना नव्या वर्षात सलग दुसरी आनंदाची बातमी दिली आहे. जिओ हॅप्पी न्यू ईयर प्लान अंतर्गत १जीबी डेटा प्रतिदिन वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी दोन नव्या ऑफर्स आल्या आहेत. नव्या ऑफरनुसार जिओने आपल्या १जीबी डेटा प्रतिदिन असलेल्या प्लानच्या किंमतीत ५०-६० रुपयांनी कपात केली आहे.