नवी दिल्ली : लक्झरी कार बनवणारी कंपनी लॅम्बॉर्गिनीने अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Alpha One असं या स्मार्टफोनचं नाव आहे. इतक्या मोठ्या कंपनीने हा स्मार्टफोन तयार केला म्हणजे याची किंमतही तशीच मोठी ठेवण्यात आली आहे.
या स्मार्टफोनची किंमत २,४५० डॉलर म्हणजे १,५७,११२ रूपये इतकी आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईटवरून खरेदी केला जाऊ शकतो.
कंपनीकडून लवकरच हा स्मार्टफोन रिटेल स्टोर्समध्ये उपलब्ध केला जाणार आहे. किंमतीवरूनच लक्षात येतं की, हा स्मार्टफोन सर्वसामान्य ग्राहकांसाठी अजिबात नाहीये. एका खास वर्गाला गृहीत धरून हा स्मार्टफोन तयार करण्यात आलाय. हा फोन इटालियन ब्लॅक लेदर फिनिशसोबत दिला जाणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा स्मार्टफोन लिक्वीड मेटलने तयार करण्यात आला आहे. हेच मेटल सुपरकार्स तयार करण्यासाठीही वापरलं जातं.
या महागड्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा २के एमोलेड डिस्प्ले देण्यात आलाय, ज्याचं रिझोल्यूशन २५६९ x १४४० आहे. तसेच ४ जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर देण्यात आलंय. यात ६४ जीबी इंटरनल मेमरी दिली गेली आणि जी मायक्रो एसडी कार्डने १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन अॅन्ड्रॉईड नॉगटवर काम करतो.
तसेच या फोनमध्ये ३२५० एमएएच बॅटरी दिली गेली आहे. फोटोग्राफीसाठी यात २० मेगापिक्सल रिअर कॅमेरा दिला गेलाय. सोबतच ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. ह स्मार्टफोन ड्यूअल सिम आहे. इतकेच नाही तर या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी एटमॉस डिजिटल साऊंड सपोर्ट देण्यात आलाय.
(Image Credit: BGR.in)